आज रावेर येथे महाविकास आघाडीतर्फे तहसील कार्यालयात केळी पीकविम्याच्या रकमा तात्काळ टाकण्यासाठी नायब तहसीलदार श्री संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले.

आज रावेर येथे महाविकास आघाडीतर्फे तहसील कार्यालयात केळी पीकविम्याच्या रकमा तात्काळ टाकण्यासाठी नायब तहसीलदार श्री संजय तायडे यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आमच्यासोबत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.श्री.राजेंद्र पाटील, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष श्री निळकंठ चौधरी,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष श्री प्रवीण पंडित यांच्यासह राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष श्री प्रल्हादभाऊ बोंडे,काँग्रेसचे अनुसूचित जातीचे प्रदेश सरचिटणीस श्री राजुभाऊ सवर्णे कामगार नेते श्री दिलीप कांबळे,वंचित बहुजन आघाडीचे श्री बाळू शिरतुरे,राष्ट्रवादी रावेर शहराध्यक्ष शेख मेहमूद, पं अ सदस्य सौ योगिता वानखेडे,योगेश पाटील,रावेरचे माजी नगराध्यक्ष हरिषशेठ गनवाणी,संतोष पाटील,योगेश पाटील,संतोष महाजन,वसिम खान,रवींद्र महाजन,पांडुरंग पाटील यांसह अन्य पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.१५दिवसांत विमा कंपनीतर्फे खात्यात रक्कम जमा न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.



