आंतरराष्ट्रीयबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

विदर्भाच्या पंढरीत राष्ट्रपतींचे केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले भव्य स्वागत!शेगाव येथील अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलनाला जनतेची अफाट लाट!एक ऐतिहासिक क्षण!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

तालुका प्रतिनिधी संग्रामपूर,

रतन भगत.

सविस्तर वृत्त असे की ,दिनांक २५ते २८/२/२०२६ या होऊ घातलेल्या अखिल भारतीय आयुर्वेदिक महासंमेलनाला भारताच्या महामहीम राष्ट्रपती  द्रोपदी मुर्म यांनी दिनांक २५/ २/ २०२६ ला विदर्भाच्या पंढरी म्हणजेच शेगावला आज प्रमुख उपस्थिती दर्शवली. त्यावेळी केंद्रीय आयुष्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महामयम राष्ट्रपती द्रोपती मुर्म यांचे भव्य दिव्य असे स्वागत केले .आज क्षण म्हणजे शेगाव साठी एक ऐतिहासिक क्षण नोंदविला गेला कारण इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रपती हे शेगावला आले आहेत. त्यांच्या येण्याने शेगाव नगरी दणदणून गेली.
 सदर कार्यक्रम हा अखिल भारतीय आयुर्वेदिक आयुष्य मंत्रालयाकडून आयोजित केला गेला. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ,आमदार ,खासदार तसेच इत्यादी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या आयुर्वेदिक मेळाव्यात आयुर्वेदिक योग होमिओपॅथिक युनानी यासारख्या विविध आयुष्य पद्धतीच्या माध्यमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी मोफत औषधोपचार सुविधा अपंगांना व दिव्यांगांना मोफत साहित्य वाटप  व उपलब्ध करून देण्यात आले आहेत.आयुर्वेदिक जनजागृती आणि पारंपारिक वैद्यकीय पद्धतीचा प्रसार हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. शहरात ठीक ठिकाणी  कडे कोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून त्यांच्या स्वागतासाठी विशेष अशी तयारी करण्यात आली होती.ठिकठिकाणी स्वागत कमानी ,बॅनर ,तसेच आकर्षक रंगीबेरंगी सजावट करण्यात आली होती. राष्ट्रपती महोदयांनी कार्यक्रम स्थळी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना निरोगी भारत घडविण्यासाठी सर्व जनतेने एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले. त्यांनी शेगावच्या धार्मिक व सांस्कृतिक परंपरेचे कौतुक केले. राष्ट्रपतींनी आपल्या उपदेश पर भाषणात सांगितले की देशाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण महिला सक्षमीकरण आणि सामाजिक एकात्मतेचे महत्व अधोरेखित केले .शेगाव सारख्या सांस्कृतिक व धार्मिक वारसा असलेल्या शहराला भेट देताना त्यांना विशेष असे आकर्षण वाटले.निरोगी भारतासाठी पारंपारिक आणि आयुर्वेदिक पद्धतीचे महत्त्व पटवून दिले. दौऱ्या दरम्यान राष्ट्रपतींनी श्री संत गजानन महाराज मंदिर येथे जाऊन श्रींच्या समाधींचे दर्शन घेतले .कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींनी उपस्थित मान्यवरांशी संवाद साधला. या महामहीम राष्ट्रपतींच्या शेगाव येथील ऐतिहासिक भेटीमुळे शेगाव शहराचे महत्व आणखी द्विगुणित झाले असून नागरिकांमध्ये अत्यंत आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button