महाराष्ट्रविदर्भ

तेल्हारा तालुक्यातील श्री गजानन पाथ्रीकर गुरुजींनी थायलंडच्या धरतीवर फडकविला भारताचा राष्ट्रध्वज

*तेल्हारा तालुक्यातील श्री गजानन पाथ्रीकर गुरुजींनी थायलंडच्या धरतीवर फडकविला भारताचा राष्ट्रध्वज*तेल्हारा तालुक्यातील श्री गजानन पाथ्रीकर गुरुजी यांनी थायलंड ची राजधानी बँकॉकमध्ये सुरू असलेल्या “थायलंड ओपन मास्टर्स गेम्स” स्पर्धेत भाग घेऊन त्यामध्ये 4 गोल्ड मेडल ,3 सिल्व्हर मेडल मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी थायलंडच्या धरतीवर भारताचे नाव झळकावून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला आहे,   आंतरराष्ट्रीय खेळाडू श्री गजानन पाथ्रीकर सर यांना प्रशस्तीपत्र व मेडल देऊन गौरविण्यात आले आहे.  गोवा स्पर्धे नंतर थायलंड येथे सुरु असलेल्या “थायलंड ओपन मास्टर गेम्स “स्पर्धेमध्ये जगातील वेगवेगळ्या देशातून वेगवान धावपटूंनी सहभाग घेतला.त्यातील एक धावपटू म्हणजे भारतातून महाराष्ट्रराज्यातील अकोला जिल्हा तेल्हारा तालुक्यातील टाकळी या छोट्याशा गावात जन्मलेले श्री गजानन पाथ्रीकर गुरुजी.60 मिटर,100मिटर, 200मिटर,400मिटर रनिंग तसेच 400*100 रिले, 400*400* रिले, 100*100 मिक्स रिले ,या सर्व स्पर्धेत एकूण 4 सुवर्णपदक व 3 रौप्य पदक मिळवून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी थायलंडच्या धरतीवर भारताचे नाव झळकावून भारताचा राष्ट्रध्वज फडकावला आहे,हि भारतीयांसाठी गौरवाची बाब आहे.ते हल्ली आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारताचे नेतृत्व करत आहेत ह. मु .तेल्हारा येथे परत आल्यावर त्यांचे नगरवासीयांकडुन जल्लोषात स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पत्नीने त्यांचे औक्षण केलेविजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button