गुन्हेगारीबुलढाणा

31,600 रुपये का गांजा जब्त.. जलगांव जामोद पुलिस की कार्रवाई…

31,600 रुपये का गांजा जब्त.. जलगांव जामोद पुलिस की कार्रवाई… आरोपी गिरफ्तार… प्रतिनिधी हरिदास इंदोरे जळगाव जामोद जळगाव जामोद ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात तालुक्यातील अवैध धंद्यावर धडाकेबाज कारवाई करण्यात येत असून अशीच कारवाई जळगाव जामोद शहरात करण्यात आली आहे. जळगाव जावई पोलीस स्टेशनला कार्यरत असलेले पीएसआय प्रशांत झेंडगे गोपनीय माहिती मिळाली की दोन तरुण मुले गांजा विक्रीसाठी घेऊन येत आहेत. अशा माहितीवरून आरोपींना पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला होता. दिनांक 19 नोव्हेंबर रोजी गुप्त माहिती मिळाल्यानुसार दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचे ताब्यातून 1 किलो 580 ग्रॅम गांजा किंमत अंदाजे 20 हजार रुपये प्रति किलो प्रमाणे 31 हजार 600 रुपयांचा गांजा पोलिसांनी जप्त केला. गांजा विक्री करणारे आरोपी जळगाव जामोद शहरातील आहेत आरोपीचे नाव विशाल संदीप सोनोने वय 24 वर्ष राहणार गौतम नगर जळगाव जामोद, अंकुश अशोक वानखडे वय 22 वर्ष राहणार भोपाल हल्ली मुक्काम गौतम नगर जळगाव जामोद या दोघांनाही शहरातील आत बाजारामधून ताब्यात घेण्यात आले अजूवर्ष राहणार गौतम नगर जळगाव जामोद अंकुश अशोक वानखडे वय 22 वर्ष राहणार भोपाल हल्ली मुक्काम गौतम नगर जळगाव जामोद या दोघांनाही शहरातील आठवडी बाजारामधून ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरोधात दिनांक 20 नोव्हेंबर रोजी अप क्र.555/2025 कलम 8 (क),20 (2) (ब), 29 एन.डी.पी.एस अॅक्ट 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ठाणेदार नितीन पाटील यांच्या मार्गदर्शनात पीएसआय प्रशांत झेंडगे, पोलीस हेडकॉन्स्टेबल निलेश पुंडे, हेड कॉन्स्टेबल गजानन मानकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन राजपूत, पोलीस कॉन्स्टेबल परमेश्वर ढोण यांचे सह जळगाव जामोद आगाराचे वाहतूक निरीक्षक पियुष पाटकर यांनी केली आहे.

पुढील तपास नारायण सरकटे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button