महाराष्ट्रसामाजिक

मन की बात द्वारे सामान्य जनतेतजागृती करणारे समर्पित पंतप्रधानमा.नरेंद्रजी मोदी.

डॉ.केतकी पाटील

जळगाव : मन की बात द्वारे सामान्य जनतेत जागृती करणारे समर्पित पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जनतेच्या विविध वर्गातील, विविध वयोगटातील घटकांसाठी सुरु केलेल्या ‘मन की बात’ या संवाद उपक्रमास रविवारच्या या टर्ममधील अखेरच्या भागाने स्वल्पविराम दिला आहे.आता लोकसभा निवडणुकीनंतरच ‘मोदी ३:०’मध्ये मोदी या कार्यक्रमाद्वारे भारतीयांशी संवाद साधतील, असा विश्वास भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा डॉ केतकी ताई पाटील यांनी व्यक्त केला.

आजच्या ‘मन की बात’मधून मोदींनी विज्ञान- तंत्रज्ञान, वन्यजीव, पर्यावरण अशा विविध विषयांवर जनतेशी संवाद साधला आणि या प्रक्रियेत सहभागी होण्याचे आवाहन केले. प्रधानमंत्रीजी ‘मन की बात’ मधून गेल्या 110 एपिसोड मध्ये देशाच्या उपलब्धतेच्या विषयी,देशाच्या सामुदायिक शक्ती विषयी निरंतर आणि समर्पित भावाने देशाच्या जनतेशी संवाद साधला आहेत. या 110 व्या एपिसोड मध्ये त्यांनी महाराष्ट्रातील सौ.कल्याणी पाटील यांच्या गांडूळ खत निर्मिती बद्दल चर्चा करून त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहित केले. महिला शक्ती ही काय करू शकते याचे उदाहरण सांगितले, याचबरोबर त्यांनी सेंद्रिय शेतीची आवश्यकता, वन्य जीवन संवर्धन आणि तंत्रज्ञानाची माहिती, रोडगी आयआयटीने तयार केलेला ड्रोन आणि वन्यजीवांचे रक्षण, गरुड अॅप विषयीची माहिती, येणाऱ्या लोकसभेत नव मतदारांना केलेले आव्हान आणि नव भारताच्या निर्मितीसाठी दिलेली साद असे अनेक विषय हाताळले हे देशवासीयांना खूप प्रेरणादायी असल्याचे डॉ केतकी पाटील यांनी सांगितले.

एका दशकात सव्वाशे करोड भारतीयांच्या समस्यांचे संपूर्ण निराकरणासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे एकमेव पंतप्रधान

गेल्या दहा वर्षाच्या कार्यकाळामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने जगामध्ये अनेक गोष्टी साध्य केले आहेत. या सगळ्या साध्य केलेल्या बाबी पंतप्रधानांनी त्यांच्या ‘मन की बात’ मध्ये मांडून त्या जनतेपर्यंत पाठवून त्याविषयी जागृती केलेली आहे. मन की बात च्या माध्यमातून पंतप्रधान मोदी हे जगातील पहिले पंतप्रधान ठरलेले आहेत.ज्यांनी सव्वाशे करोड भारतीयांच्या समस्या आणि त्यावर असलेले निराकरण अगदी मेक इन इंडिया पासून म्हणजेच उद्योगापासून तंत्रज्ञानापासून पारंपारिक पद्धती, पाणी समस्या, पाणी प्रदूषण, ते बनारसी साडी, खादी यांची केलेली ब्रॅण्डिंग आणि छोट्या छोट्या गोष्टी हाताळून समाजामध्ये केलेली जागृती ही खूप प्रेरक अशी असल्याचे ही डॉ.केतकी पाटील म्हणाल्या.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button