गुन्हेगारीविदर्भसामाजिक

‘खळबळजनक पंजाब नॅशनल बँक व्यवस्थापकावर चाकू हल्ला’

पंजाब नॅशनल बँक शाखा खामगाव येथे व्यवस्थापक शंतनू राऊत यांच्यावर चाकू हल्ला; गंभीर जखमी.. जी.डी.रोकडे खामगाव प्रतिनिधी. खामगाव, स्थानिक नांदुरा रोडवरील तुळजाई टॉवर मधील पंजाब नॅशनल बँक खामगाव शाखेत किरण रवींद्र गायगोळ रा. जळका भडंग हा नेहमीप्रमाणे 13 फेब्रुवारी 24 रोजी सकाळी 10,30 वाजताच्या सुमारास बचत गटाचे पैसे काढण्यासाठी आला होता. यावेळी त्याने बँक व्यवस्थापक शंतनु राऊत त्यांना विड्रॉल फॉर्म व ठराव रजिस्टर ची छायांकित प्रत दाखविली असता. बँक व्यवस्थापक राऊत यांनी मूळ ठराव रजिस्टर घेऊन येण्यास सांगितले. त्यानंतर किरण गायगोळ निघून गेला व परत दुपारी 3 वाजता च्या सुमारास बँकेत आला.व ठराव रजिस्टर ची मूळ प्रत उद्या घेऊन येतो असे म्हणून निघून गेला . व नंतर दुपारी 4.15 वाजताच्या सुमारास बँकेत आला यावेळी व्यवस्थापक शंतन राऊत हे केबिनच्या दरवाजवळ ग्राहकांशी बोलत असताना किरण गायगोळ याने तुला खल्लास करतो असे म्हणून त्यांच्या पोटात चाकूने वार केला. दुसरा वार करीत असताना बँक कर्मचारी अरविंद श्रीराम निंबाळकर यांनी आवरण्याचा प्रयत्न केला असता त्याचे हाताला गंभीर ईजा झाली आहे. वरील तक्रार शहर पो. स्टे खामगावला दिली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button