
या दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रकाशित केला होता ,मूकनायक साप्ताहिकाचा पहिला अंक!
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.३१ ; तेल्हारातील नवनिर्मित पत्रकार भवन मध्ये आज मूकनायक दिन तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने साजरा करण्यात आला .भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी ३१ जानेवारी १९२० साली मूकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक मुंबईतून प्रकाशित केला होता त्यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सिड्म कॉलेजला प्राध्यापक म्हणून शासकीय सेवेत होते मात्र या साप्ताहिकाचे व्यवस्थापन अग्रलेख व इतर कामे हे डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाहत होते या साप्ताहिकाचे पहिले संपादक पांडुरंग नंदराम भटकर यांनी काम पाहिले राजे छत्रपती शाहू महाराज यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना या साप्ताहिकासाठी देणगी म्हणून अडीच हजार रुपये दिले होते महिला शोषित पीडित यांच्या वेदना समस्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी कोणत्याही राजकीय,सामाजिक, संघटना,चळवळ यांचे मुखपत्र असणे आवश्यक आहे नाहीतर ते राजकीय पक्ष सामाजिक संघटना चळवळ पंख छाटलेल्या पक्षाप्रमाणे आहे याच उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी ३१ जानेवारी १९२० साली मूकनायक या साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित केला यानिमित्त आज तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या वतीने नवनिर्मित पत्रकार भवनात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून मूकनायक दिन साजरा करण्यात आला
यावेळी जेष्ठ पत्रकार डॉ. संतोष ताकोते व मनोहर गोलाईत यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारअर्पण करण्यात आले यासोबतच सर्व उपस्थित पत्रकारांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तालुक्यातील महिला पत्रकार दीपिका मुराई ह्या पत्रकारिता क्षेत्रांमध्ये पदवीधर ,उच्चशिक्षित असून या ठिकाणी त्या आवर्जून उपस्थित होत्या यावेळी त्यांचा सत्कार तालुका पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आला यानंतर तेल्हारा तालुका पत्रकार संघाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली यामध्ये तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या मुख्य सल्लागारपदी ज्येष्ठ पत्रकार डॉ.संतोष ताकोते व मनोहर गोलाईत तर तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुनील तायडे,ता.सचिव गजानन राठोड, ता.कार्याध्यक्ष दिपिका मुराई,ता.कोषाध्यक्ष राजेंद्र तिहले,ता. प्रसिद्धी प्रमुख रक्षित बोदडे,ता.संघटक अनिल भाकरे,ता.उपाध्यक्ष योगेश अठराडे,ता.सहसचिव सुनील गवई,ता.उपाध्यक्ष गणेश सोनटक्के, यांच्या सर्वानुमते तेल्हारा तालुका पत्रकार संघाच्या पदावर नियुक्ती करण्यात आले यावेळी अनिल भाकरे, गणेश उमाळे, विलास बेलाडकर,विनोद सगणे,सिद्धार्थ गवारगुरू, डॉ. संतोष ताकोते, मनोहर गोलाईत, रक्षित बोदडे, सुनील तायडे, गजानन राठोड, सेवक्राम हेरोडे,राजेंद्र तिहिले,,धम्मदिप बोदडे, संदेश गवारगुरू,शोयब खान ,दिपिका मुराई,योगेश अठराडे,सुनील गवई यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.



