महाराष्ट्रविदर्भसामाजिकसांस्कृतिक

लिटिल स्टार कॉन्व्हेंट ,तेल्हारा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि. २७ ;
श्री नटराज बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित लिटिल स्टार कॉन्व्हेंट ,दत्तवाडी ,तेल्हारा येथे शुक्रवार दि. २६ जानेवारी २०२४ रोजी ७५ वा प्रजासत्ताक दिन हा लिटल स्टार कॉंव्हेंट चे मुख्याध्यापक उमेश दयारामजी म्हसाये गुरुजी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी भारतीय सैन्य दलाचे माजी सैनिक राम पाऊलझगडे यांची प्रमुख उपस्थिती होती, तसेच लिटल स्टार कॉन्व्हेंट मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनंदभाऊ राठी , तर प्रमुख उपस्थित माजी सैनिक राम पाऊलझगडे याची होती. यावेळी कॉन्व्हेंट चे कर्मचारी सौ. बिडवे मॅडम ,घाटोळ मॅडम , गावंडे ताई उपस्थित असून ,किशोर खोटरे, मनोजभाऊ अनेरकर , सतिषभाऊ सावरकर यांनी अथक परिश्रम घेतले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमानंतर स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले तसेच प्रमुख मान्यवरांनी संस्थेच्या कार्याबद्दल विशेष उल्लेख करून विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे कौतुक करून त्यांना बक्षीसे वाटप केली. याप्रसंगी पालकांनीही उत्साही सहभाग घेऊन देशभक्तीपर गीत गायन करुन आपली देशभक्ती सादर केली आणि हा कार्यक्रम उत्साहात साजरा केला. या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सौ. खेळकर मॅडम, यांनी तर आभार प्रदर्शन सौ.गुहाड मॅडम यांनी केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button