अयोध्या येथील प्रभु श्रिराम प्राणप्रतिष्ठा व मंदिर लोकार्पण सोहळ्या निमित्य तेल्हारा शहरात विविध कार्यक्रम

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी
तेल्हारा दि.२३ ; शहरात गल्लो-गल्ली ,चौका-चौकात अयोध्येतील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा व मंदिराच्या लोकार्पण सोहळा निमित्त्याने अतिशय उत्साहाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा व मंदिराचे लोकार्पण हे सोमवार दि. २२ जानेवारी २०२४ रोजी करण्यात आले. या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी गावातील राम भक्तांचा उत्साह चौका-चौकात पहावयास मिळाला. सर्वच मंदिरात दिवसभर भक्तांची मांदियाळी दिसून आली. पूजा अर्चा ,मंगल पाठ , महाप्रसाद व सामुदायिक महाआरती ,असे विविध कार्यक्रम भक्तिमय वातावरणात झाल्याचे दिसून आले , तेल्हारा येथे श्री राम मंदिरात तीन दिवस सातत्याने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये पहाटे ०५:३० वाजता महा काकड आरती शहर प्रदक्षिणाचे आयोजन केले होते त्यामध्ये हजारोच्या संख्येने भाविकांनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये सर्व वातावरण राममय झाले होते, रामनामाच्या तालावर आनंद उत्सव साजरा करण्यात आला. तर सायंकाळी ०५:०० वाजता शहरातील सेठ बन्सीधर विद्यालयात सदविचार परिवाराच्यावतीने सुश्री अलकाश्री यांच्या सुमधुर वाणीतून संगीतमय रामायण पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने भक्तांनी उपस्थिती दर्शविली या कार्यक्रमात सुश्री अलकाश्री यांचे स्वागत सदविचार परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री गोपालदासजी मल्ल ,अशोक राठी ,वासुदेव गोदे ,डॉक्टर विक्रम जोशी ,विठ्ठल खारोडे ,मोहन गांधी ,संदीप सोळंके ,श्रीकांत पात्रीकर यांच्या वतीने स्वागत करण्यात आले तर लोकजागर मंचचे संस्थापक अध्यक्ष तथा प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लोकप्रिय अनिलभाऊ गावंडे यांच्या वतीने आरती करण्यात आली व महाप्रसादाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते .शहरातील प्रत्येक घराघरात दिवे लावून ,फटाके फोडून ,नवीन कपडे परिधान करून तसेच आपल्या घरावर भगवा ध्वज ऊभारुन श्रिराम दिवाळी साजरी करण्यात आली संपूर्ण शहर भक्तिमय झाले होते ,शहरातील टावर चौकात राम नामाचा जयघोष करण्यात आला व डीजेच्या निनादात अनेक युवा भक्तांनी ताल धरला होता. शहरात भगव्या पताका झेंडे लावण्यात आले, काकडा आरती नंतर हजारो भक्तांना लाडूचा वाटप करण्यात आला . या कार्यक्रमाला पुरुषांसोबत महिलांचा सुद्धा प्रचंड असा सहभाग पहावयास मिळाला.



