अवैध रेतीच्या वाहतुकीत शेगाव तहसीलदार समाधान सोनवणे यांची भागीदारी !

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शेगाव तहसील हद्दीत गेल्या अनेक दिवसापासून अवैध रेतीच्या वाहतूकदारांकडून लोकाच्या जीवांचा खेड चालू आहे. या सुसाट बाहने चालवण्याच्या अंदाधुद कारभारामुळे मागच्या महिन्यात एका मुलीला आपला जीव गमावा लागला व दोन दिवसापूर्वी जलम परिसरात अवैध रेती वाहतुकीच्या टिप्पर मुळे एका माणसाचा पाय चिरडला गेला. तरीही जिल्ह्याचे महसूल प्रशासन काय चूक बसत आहे. असा सवाल शेगाव तालुक्यातील संतप्त जनतेकडून व्यक्त होत आहे. या सर्व कारणांमध्ये शेगाव तहसीलचे तहसीलदार समाधान सोनवणे यांची भागीदारी असल्यामुळे ही अवैद रेतीची
वाहने भरधाव धावताना दिसत आहेत. त्यामुळे संतास जनतेकडून व खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांच्याकडून कलेक्टरला समाधान सोनवणे
तहसीलदार शेगाव यांना निलंबित करा अशा प्रकारची मागणी होत आहे. तहसीलदार समाधान सोनवणे यांना जर निलंबित केले नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल अशा
प्रकारचा इशारा संतम जनतेने व आमदार आकाश फुंडकर यांनी महसूल प्रशासनाला केलेला आहे.



