गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

घरासमोर उभी स्कुटी पेटवून दिली

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । घरासमोर उभी केलेली स्कुटी अज्ञाताने रात्री दरम्यान पेटवून दिल्याची घटना स्थानिक रेल्वे कॉलनी भागात उघडकीस आली.

मच्छींद्र धोंडीराम नरवाडे (६०) रा. रेल्वे कॉलनी यांनी त्यांची स्कुटी क्र. एमएच२८बीसी०६६५ ही ८ जानेवारीच्या रात्री घरासमोर उभी करून ठेवली होती. रात्री दरम्यान कुणीतरी अज्ञात विघ्नसंतोषी व्यक्तीने नरवाडे यांची सदर स्कुटी पेटवून दिली. यात पुर्णपणे स्कुटी जळून खाक झाल्याने त्यांचे अंदाजे ५० हजाराचे प नुकसान झाले. ही घटना आज पहाटे निदर्शनास आली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत नरवाडे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द कलम ४३५ भादंविनुसार गुन्हा दाखल केला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button