अवैध गुटखा वाहतूक करणाऱ्या एकाला अटक आठ लाखाचा मुद्देमाल जप्त मुक्ताईनगर पोलिसांची कारवाई

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) :-
सविस्तर वृत्त असे की महाराष्ट्र राज्य सरकारने गुटखा बंदी केलेली असताना सुद्धा मुक्ताईनगर नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभरात गुटखा कुठे मिळणार नाही असं एकही शहर किंवा गाव यातून सुटलेले नाही कारण महाराष्ट्रात गुटखाबंदी असली तरी महाराष्ट्राच्या बाजूने असलेली मध्यप्रदेश सारखी राज्यांमध्ये गुटखाबंदी कायदा लागू नसल्यामुळे या राज्या मधून मोठ्या प्रमाणावर गुटखा हा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शहरात आणि गाव खेड्यापर्यंत पोहोचवला जातो मुक्ताईनगर तालुक्याला लागूनच मध्य प्रदेश सीमा असल्यामुळे या ठिकाणाहून मुक्ताईनगर मधून मोठ्या प्रमाणात गुटख्याची तस्करी केली जात असल्याचे चित्र अलीकडच्या काळात नित्याचेच झालेले आहे परंतु काल दिनांक 21 रोजी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांना गुप्त माहिती मिळाली की एक वॅगनार गाडीमध्ये लाखो रुपयांचा गुटखा घेऊन मुक्ताईनगर मध्ये येत आहे त्यांनी तात्काळ पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर पो हे कॉ विनोद सोनवणे पो ना संदीप वानखेडे पोकॉ दीपक ढाकरे पो कॉ राहुल बेहनवाल यांचे एक पथक तयार करून मुक्ताईनगर येथील प्रवचन चौकात बजरंग टी स्टॉल जवळ नाकाबंदी करून 4:30 च्या दरम्यान एक पांढरा रंगाची आणि गाडीच्या चारही दारांचे व डिकीच्या काचा काळा रंगाच्या फिल्म चढवलेल व्हॅगनार वाहनाचा क्रमांक एमपी 68 झेड ए 98 62 अडवून त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये विमल आणि करमचंद पान मसाला गुटखा असा एकूण 8,29,220 रुपयांचा मुद्देमाल मिळून आलेला आहे तसेच आरोपी शेख अबिद शेख जाहीर राहणार राजघाट काली मशीद जवळ बऱ्हाणपूर तालुका जिल्हा बऱ्हाणपूर राज्य मध्य प्रदेश याच्या विरुद्ध महाराष्ट्र शासनाने राजपत्राद्वारे उत्पादन विक्र वितरण व साठा तसेच वाहतूक यासाठी प्रतिबंधित केलेल्या अन्न व पदार्थांचा साठा संबंधित अन्नपदार्थ हे महाराष्ट्र शासन अधिक सूचना क्रमांक अधिसूचना 524/7 चे उल्लंघन करून मध्य प्रदेश राज्यातून विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगून पुरवठा करण्यासाठी वाहतूक करताना मिळून आला आहे त्याच्या ताब्यातील वाहन पाच लाख वीस हजार रुपये किमतीची व्हॅगनार गाडी जप्त करण्यात आले असून त्याच्या विरुद्ध भा द वि कलम 328 ,272 ,273 ,188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे



