
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
श्याम पहूरकर
शहाजी ले-आऊट, हॉटेल विघ्नहर्ता मागे, खामगांव रोड, शेगाव येथे चालत असलेला वेश्या व्यवसाय बंद करा अशा मागणीचे निवेदन तेली समाज मंडळ, शेगावच्या वतीने 12 डिसेंबर रोजी ठाणेदार सुनील अंबुलकर यांना देण्यात आले.
खामगाव रोड वरील राजे शहाजी ले-आऊट मध्ये तेली समाजाचे निर्माणाधिन संताजी भवन, शिव मंदिर तमेच नागरी वस्ती आहे. याठिकाणी विविध सामाजिक कार्यक्रम तसेच भाविक दर्शणासाठी येत असतात. हॉटेल विघ्नहर्ता ते राजे शहाजी ले-आऊट या
रस्त्यावरिल एका ईमारतीमध्ये दिवस-रात्र वेश्या व्यवसाय चालतो. तसेच या रस्त्यावर व परिसरात दारू पिणारे धिंगाणा घालत असतात, त्यामुळे येथील नागरिकांना, संताजी भवनात कार्यक्रमासाठी येणा-या पाहुण्यांना तसेच दर्शनार्थी भाविकांना अतिशय त्रास होत आहे. करिता हा उपद्रव थांबविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनावर तेली समाज मंडळ अध्यक्ष टी. आर. नायसे, सचिव वसुदेव राठोड, सहसचिव बाळू सोनटक्के, मुकुंदा खेळकर, सुरेश काकड यांच्यासह अनेकांच्या स्वाक्ष-या आहेत.



