बुलढाणामहाराष्ट्र

ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती शेगाव तालुका अध्यक्षपदी पत्रकार सागर सिरसाट यांची नियुक्ती

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

शेगांव – ग्राहक संरक्षण सोसायटी संपूर्ण भारतभर कार्यरत आहे. ग्राहकांची फसवणूक होऊ नये म्हणून किंवा ग्राहकांची जर फसवणूक झाली जश्या प्रकारे आज ग्राहकांना साठेबाजी, काळाबाजार, भेसळ, अप्रमाणित वस्तूंची विक्री, चढ्या भाव, हमीभावानंतर सेवा न देणे, सर्वत्र फसवणूक, मोजमाप कमी आदी समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. ग्राहक संरक्षणासाठी विविध कायदे करण्यात आले, परिणामी ग्राहक आज सरकारवर अवलंबून झाला आहे. साठेबाजी, काळाबाजार, भेसळ आदी बेकायदेशीर कामे करणाऱ्यांना राजकीय संरक्षण मिळते. ग्राहक संघटित नसल्याने त्यांची सर्वत्र फसवणूक होते. कायदेशीर लढाई लढण्यासाठी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती कार्यरत आहे.ग्राहक संरक्षण कल्याण हक्क कायदा1986/2019 अंतर्गत क्षेत्रात काम करण्यासाठी ग्राहक पद्धती, कायदेशीर ज्ञान, सामाजिक कार्य आणि स्वतःची इच्छाशक्ती लक्षात घेऊन शेगाव तालुका अध्यक्ष या पदावर पत्रकार सागर सिरसाट यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्राहक उपभोक्ता संरक्षण समिती सरकार मान्यता सर्व संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या संमतीने 30/12/2024 पर्यंत हे नियुक्ती करण्यात आली आहे.
जागे व्हा ग्राहकांनो, जागे करा ही संज्ञा, जिल्हा, तहसील, प्रभाग, गाव पातळीवर शाखा निर्माण करा. अशी नियुक्ती पत्राद्वारे राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब केदारे यांनी आव्हान देखील केलेले आहे.

चौकट — सागर पत्रकार सागर सिरसाट

कायदेशीर बाबींचे ज्ञान असलेले, स्वेच्छेने काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा अधिकार मला दिल्याबद्दल मी वरिष्ठांच्या आभार मानतो… प्रशिक्षण आणि शिबिरांच्या माध्यमातून ग्राहक संरक्षण समिती सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी सहकारी क्षेत्रातील कायदेशीर कामे करण्यासाठी माहितीचा पुरवठा करण्यासाठी तत्पर राहणार.त्या प्रमाणे मी आशा करतो की ग्राहक संघाचे सदस्य आणि अधिकारी संख्या वाढवण्यासाठी मी शंभर टक्के प्रयत्न करणार.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button