बुलढाणामहाराष्ट्रमुबईविदर्भ

मानवाधिकार ॲक्शन फोरम तर्फेविश्व मानवाधिकार दिवस उत्साहात साजरा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तालुका प्रतिनिधी
-तेल्हारा
दि.१२ :
संपूर्ण जगात १० डिसेंबर हा दिवस विश्व मानवाधिकार दिवस म्हणून साजरा केला जातो त्या अनुषंगाने मानवाधिकार ॲक्शन फोरम तर्फे सुद्धा हा दिवस राष्ट्रीय पातळीवर साजरा करण्यात आला. विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार अकोला जिल्हा कार्यकारणीच्या वतीने आर डी जी कॉलेज अकोला येथे हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला यामध्ये विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवर मानविप्रेम वृद्धिंगत व्हावे , शांतता नांदावी या करीता करीत असलेल्या कार्याची माहिती दिली व आवश्यक मोलाचे मार्गदर्शन या ठिकाणी करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला राष्ट्रीय उपाध्यक्ष अडव्हाकेट कैलास बिसकुंदे, संतोष पोवराज सर, अकोला जिल्हा प्रमुख प्रा योगेश कोरपे सर, सौ, सुनिता कद्दे,सौ राखी बिसकुंदे, अकोला जिल्हा मिडिया प्रमुख पंकज भारसाकळे ,संतोष छागाणी ,सह आदीं उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button