खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगर

मुक्ताईनगर शहरांसह तालुक्या मध्ये विमल गुटख्यांचा धुमधडाका पोलीस व अन्न औषध प्रशासनाचा कानाडोळातालुक्यामध्ये विकला जातोय करोडचा गुटखा

मुक्ताईनगर शहरांसह तालुक्या मध्ये विमल गुटख्यांचा धुमधडाका पोलीस व अन्न औषध प्रशासनाचा कानाडोळा
तालुक्यामध्ये विकला जातोय करोडचा गुटखा

प्रतिनिधि अमोल
मुक्ताईनगर शहरामध्ये विमल गुटखा हा मोठ्या प्रमाणात विकला जात आहे नेमके यामागे आशीर्वाद तरी कोणाचा असे बोलले जात आहे बहुतांश वेळा मुक्ता नगर शहरांमध्ये विमल गुटख्यांच्या गाड्या पकडल्या जात होत्या कारवाइ वर कारवाई होताना दिसून आल्या पोलीस प्रशासनामार्फत व अन्न औषध प्रशासनामार्फत परंतु आता मात्र दिवसाढवळ्या व रात्री च्या सुमारास सुद्धा मोठ्या प्रमाणात मोठ मोठ्या लोडिंग अवैध गुटख्यांच्या गाड्या पास होत आहे तर या अवैध विमल गुटक्यांच्या गाड्या पास होतात तरी कशा यामागे कोणाचा हात आहे प्रशासनाचा की राजकीय वरदस्थाचा असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होताना दिसून येत आहे
मुक्ताईनगर शहराला विशिष्ट राज्याच्या सीमा लागलेल्या असून या सीमे लगतच मध्य प्रदेश ची सीमा लागून आहे मध्य प्रदेशांमध्ये गुटखा हा मोठ्या प्रमाणात चालत असून याची प्रशासनामार्फत विक्रीसाठी कुठलीही बंदी नसून हा गुटखा ब्रानपुर येथून किंवा शहापूर येथून महाराष्ट्रामध्ये म्हणजेच येथील मुक्ताईनगर शहरांमध्ये व जळगाव जिल्हा तसेच औरंगाबाद धुळे नंदुरबार अशा विविध ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रभर या घुटक्याची विक्री मोठ्या प्रमाणात होत असते परंतु हा गुटखा मध्य प्रदेशातून येताना मध्य प्रदेशचे चेक पोस्ट व महाराष्ट्राचे चेक पोस्ट यांची सीमा असताना देखील हा गुटका महाराष्ट्र चेक पोस्ट यातून नेमका पास होतो तरी कसा असा प्रश्न देखील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे या वाहनांची महाराष्ट्र चेक पोस्टवर तपासणी होत नाही का होत असेल तर ही वाहने महाराष्ट्र चेक पोस्ट वरून तपासणी आरटीओ अधिकारी कसे काय सोडतात की यांना पैसे देऊन डायरेक्ट सोडले जात असते जर यांना डायरेक्ट सोडले जात असेल तर नेमका तो आरटीओ अधिकारी कोण व महाराष्ट्र चेक पोस्ट वरून जरी असे अवैधरित्याचे वाहने सोडले जात असतील तर मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन करते तरी काय तसेच अन्न व औषध प्रशासन यांचाही यामागे कानाडोळा होत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे चेक पोस्टवरील आरटीओ तसेच मुक्ताईनगर येथील पोलीस प्रशासन व अन्न औषध प्रशासन यांचा तिघांचा साठे लोटे चा प्रकार असल्याशिवाय व मुक्ताईनगर शहरातून अवैध गुटख्यांची किंवा अवैध कुठल्याही प्रकारची गाडी पासच होऊ शकत नाही यावर मुक्ताईनगर वासियांकडून प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे नेमका तो अधिकारी कोण, पूर्णाड फाट्यावर देखील बऱ्याच वेळा बंदोबस्त पोलीस प्रशासनाचा असतो परंतु कुठलेच वाहन तपासले जात नाही का तपासले जात असतील तर कुठल्याच वाहनांमध्ये अवैधरित्या असलेले विमल चे झोले आढळून आले नसतील का असाही प्रश्न मुक्ताईनगर नगरातील सुज्ञ नागरिकांना पडलेला आहे बहुतांश पी आय हे मुक्ताईनगर शहराला लाभले असून त्यांच्या कारकीर्दीमध्ये बहुतांश वेळा अन्न औषध प्रशासनामार्फत किंवा पोलीस प्रशासनामार्फत अवैध विमल गुटक्यांची तस्करी करताना किंवा गुटखा मालवाहतूक गाड्यांमधून वाहून नेतांना पकडल्या गेल्या आहे परंतु मोहिते साहेब आल्यापासून कुठलीही अवैध विमल गुटक्याचा धंद्यांवर कारवाई होताना दिसून आली नाही या मागचे गुड रहस्य काय मुक्ताईनगर शहरांमध्ये महिन्याकाठी चार चार वेळेस किंवा पाच पाच वेळेस मोठं मोठी विमल गुटख्याची वाहने पकडल्या जात होती परंतु मुक्ताईनगरला लाभलेले पोलीस निरीक्षक मोहिते साहेब आल्यापासून अवैध विमल गुटख्या वाल्यांचा धंदा बंद पडला नसून परंतु उभारीने नवीन उमदीने नवीन पंटर अवैध विमल गुटक्याचा धंदा जोमाने करत आहे याकडे पोलीस निरीक्षक यांचे लक्ष नसेल का की आर्थिक हितसंबंध जोपासता यांना उभारी देत आहे की याला राजकीय वरदहस्त आहे असा गंभीर प्रश्न उपस्तीत होत आहे
मागील काही महिन्यांपूर्वी अधिवेशनामध्ये माजी मंत्री एकनाथरावजी खडसे यांनी अवैध गुटखा यावर आवाज उठवला होता व त्याच बरोबर अवैध विमल गुटक्यांच्या गाड्या देखील मोठ्या प्रमाणात पकडल्या गेल्या होत्या त्याचबरोबर आमदार चंद्रकांत भाऊ पाटील यांनी देखील अवैध गुटख्यांची गाडी येत असल्याची माहिती मिळताच स्वतः मध्य प्रदेशातून येत असलेले वाहन पुरनाड फाट्यावर नवीनच बुलेरो पिकप पूर्ण मालाने भरलेली मुक्ता नगर पोलीस प्रशासनाच्या सुपूर्त केले होते मात्र त्यानंतर मुक्ताईनगर पोलीस प्रशासनाला नवीनच रुजू झालेले पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी आज तागायत कुठलीही अवैध धंद्याबाबत कारवाई केलेली नसून अवैध धंद्यावाल्यांना कशाबाबतची सूट दिली जात आहे हे देखील गुलदस्त्यातच बंद आहे शहरांमध्ये गल्लीगल्ली मध्ये मुख्य परिवर्तन चौकात देखील टप्प्यांवर विमल गुटक्यांची विक्री जोमाने सुरू असून नेमका एवढा साठा येतो कसा काय असा प्रश्न मुक्तानगर वासियांना पडला आहे मुक्ता नगर वासियांकडून असेही बोलले जात आहे की आधी बुलेरो पिकप अशा मोठ्या अवजड वाहनांमध्ये विमल गुटख्यांची तस्करी होत होती परंतु आता घरगुती चालणारी गाडी फोर व्हीलर स्विफ्ट डिझायर, झायलो अशा घरगुती गाड्यांमधून विमल गुटख्यांची तस्करी केली जात असल्याची चर्चा मुक्ताईनगर नगर वासियान कडून होत आहे मुख्य चौकामध्ये तिरंगा ध्वज देखील फडकत असतो त्या चौकाच्या हाकेच्या अंतरावर टपऱ्या उपलब्ध असून सहजरीत्या टपऱ्यावर हा गुटखा उपलब्ध होत आहे ही आजची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन होऊन कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत आहे लहान चिमुकले मुले देखील याचे सेवन करताना आढळून येत असून महिला वर्ग देखील विमल गुटक्यांचा जास्त प्रमाणात सेवन करताना दिसत आहे या अवैध विमल गुटख्यावर मुक्ताई नगर येथील पोलीस प्रशासन कारवाई करणार का की असेच आर्थिक हितसंबंध जोपासून अवैध धंदा चालू राहणार अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे मुक्ताईनगर पोलीस स्टेशनच्या आवारातच विमल गुटख्यांच्या रिकाम्या झालेल्या पुड्या पडलेल्या अस्ताव्यस्त अवस्थेत दिसत असतात व त्या ठिकाणी भिंती देखील विमल गुटक्यांच्या पिच्कारा मारून मारून रंगीबेरंगी केलेल्या आढळून आल्या आहेत नेमके विमल गुटख्याचे सेवन करते तरी कोण तहसील व पोलीस प्रशासनाच्या आवारामध्ये कर्मचारी की नागरिक ?
अन्न औषध यांचे अधिकारी देखील गप्प असल्याचे दिसून येत आहे नेमके गप्प राहण्याचे कारण काय मुक्ता नगर तालुक्यातील विमल घोटक यांचे अवैध धंदे करणाऱ्यांसोबत आर्थिक व्यवहारांमध्ये वाढ झाली का ? असा मोठा गंभीर प्रश्न शहरातील नागरिकांना पडलेला असून नागरिक चर्चा करत आहे वरिष्ठ पातळीवरून याबाबतची चौकशी होणार का पोलीस अधीक्षक साहेब याकडे लक्ष देतील का व अशा अवैध धंद्यांना आळा बसवणार का व शाळकरी मुलांचे जीवन उध्वस्त होण्यापासून वाचवतील का असा प्रश्न चिमुकल्या मुलांच्या आई-वडिलांना पडलेला आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button