संग्रामपूर बाजार समीतीची हरवलेली पारदर्शकता पुन्हा प्राप्त होणार का.?

संग्रामपूर/ शेतकऱ्यांच्या हितासाठी आमच्या पुर्वजांनी जोपासलेल्या ख.वि.संघ व कृषी उत्पन्न बाजार समितीची हरवलेली पारदर्शकता प्राप्त होणार कि पुन्हा बाजार समिती भ्रष्टाचार करणाऱ्यांच्या ताब्यात जाणार हा संशोधनाचा विषय ठरला आहे. संग्रामपूर तालुक्यात सुरू असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत दोन पॅनल अमोरा समोर उभे ठाकले आहेत. एका बाजूने भाजप,शिंदे गट तर दुसऱ्या बाजूने भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना (उबाठा गट ) वंचित बहुजन आघाडी व स्वाभिमानी शेतकरी संघटना असे पाच पक्षाचे कार्यकर्त्यांनी एकत्र येत शेतकरी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपले १८ उमेदवार निवडणूकीसाठी मैदानात उतरवले आहेत. मागिल वर्षी संग्रामपूरातील राज्यभर गाजलेला तुर घोटाळा शेतकरी अजुन विसरले नसल्याने सुज्ञ शेतकरी-मतदार या निवडणुकीत शेतकऱ्यांच्या तुरीवर डल्ला मारणाऱ्या पार्टिचा हिशोब चुकता करणार असल्याच्या चर्चा तालुकाभर मतदारांमध्ये होतांना दिसत आहे. शेतकरी शेतमजूरांसाठी अहोरात्र लढणारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजापाचे तुर घोटाळ्याचे अंडे पिल्ले बाहेर काढले होते. अशा भाजपधरणी विरोधात स्वाभिमानीने महाविकास आघाडीमधे सामिल होऊन पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने शेतकरी मतदारांमधे नवा जोश निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभारलेली संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी तालुक्यातील कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. तर सत्ताधारी पार्टिच्या उमेदवारांनी दरनिवडणुक प्रमाणे पैशाच्या जोरावर मतदार विकत घेता येतील काय याची चाचपणी सुरू केली असुन काही उमेदवारांनी आमदार, खासदार कडुन बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे मतदारांना प्रलोभन दाखवून मतांची जुळवाजुळव करत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. २० वर्षांपासून आमदार,खासदार कडुन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी निधी आणता आला नाही अचानक निवडणुकीत उमेदवारांना निधीची आठवण कशी काय असा प्रश्न मतदार विचारत आहेत. आता कितीही प्रलोभने मतदांराना दाखवली तरी आता मतदारांनी ठरवलय संग्रामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी या निवडणुकीत भ्रष्टाचारांना मातीत गाडायचे हा संकल्प मतदारांनी केला आहे हे विशेष..



