गोपनीय माहितीच्या आधारावर दरोडेखोरांना दरोडा टाकण्याआधीच अटक मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी

गोपनीय माहितीच्या आधारावर दरोडेखोरांना दरोडा टाकण्याआधीच अटक मुक्ताईनगर पोलिसांची कामगिरी
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे):-
सविस्तर वृत्त असे की पोलीस अधीक्षक जळगाव एम राजकुमार अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री राजकुमार शिंदे यांनी वेळोवेळी नाकाबंदी करणे सराईत गुन्हेगार तपासणी करणे याबाबत सूचना दिलेल्या होत्या त्याच अनुषंगाने मुक्ताईनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी मुक्ताईनगर तालुक्यातील विविध ठिकाणी नाकाबंदी करण्याचे तसेच कसून चौकशी करण्याचे आदेश दिले होते त्यातच पोलीस निरीक्षक मोहिते यांना गोपनीय माहिती मिळाली की कुऱ्हा मुक्ताईनगर रोडवर एक राखाडी रंगाची मारुती इको गाडी घेऊन त्यामध्ये पाच ते सहा इसम त्यांच्या गाडीमध्ये हत्यारा सह दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत माहिती मिळतात क्षणी पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांनी पोलीस उपनिरीक्षक राहुल बोरकर पो. ना. विनोद सोनवणे पो. अ. संदीप वानखेडे ,राहुल बेहेनवाल ,सागर सावे, मोतीलाल बोरसे , प्रदीप इंगळे यांना तात्काळ घटनास्थळी जाऊन वाहनाची तपासणी करण्याचे आदेश दिले तात्काळ पथक कुऱ्हा रोडणे पेट्रोलिंग करत असताना त्या रोडने ये जा करणाऱ्या लोकांनी माहिती दिली की चिचखेडा फाट्याजवळ राखाडी रंगाची मारुती इको गाडी आणि हातात लोखंडी रॉड शस्त्र आणि पाच ते सहा जण गाडी थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत अशी माहिती मिळताच नियुक्त पथकाने तात्काळ घटनास्थळ गाठत अंधारात लपत छपत जाऊन दरोडे च्या तयारीत असलेल्या चार जणांच्या मुस्क्या आवळल्या त्यापैकी दोन जण अंधाराचा फायदा घेत झाडाझुडपांचा फायदा घेत पसार झाले त्यापैकी कंवरलाल रामप्रसाद पवार वय 35 राहणार मधापुरी, देव डॅनी पवार वय 22 राहणार मधापुरी, राहुल कापीलाल भोसले वय 23 राहणार मधापुरी, करण कपूर डॅनी पवार वय 24 राहणार मधापुरी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांच्याकडून एक धारदार तलवार, एक लोखंडी रॉड, एक सुरा, तीस फूट लांबीचा एक पांढरा रंगाचा दोर राखाडी रंगाची मारुती इको गाडी नंबर एम एच 19 ई ये 4608 असा एकूण 495030 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे या आरोपींविरुद्ध cctns No 416/2023 भादवि कलम 399,402 सह भारतीय हत्यार कायदा कलम 4/25 मपोका कलम37(1)(3) चे उल्लंघन कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप धनगहू हे करत आहेत



