विदर्भसामाजिक

तेल्हारा नगर परिषदेच्या “स्मार्ट श्रीमती तेल्हारा २०२३” या स्पर्धेचा लकी ड्रॉ सोडतीचा कार्यक्रम संपन्न. ..ह्या महिलांची झाली निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा ता.प्रतिनिधी-विजय घोडे

तेल्हारा दि.२३; तेल्हारा शहरांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्वच्छता अभियान या उपक्रमाअंतर्गत तेल्हारा नगरपरिषदेने स्मार्ट श्रीमती तेल्हारा २०२३ हा उपक्रम सुरू केला आहे ,पंधरा दिवसानंतर त्या उपक्रमाच्या पहिल्या लकी ड्रॉ ची सोडत दि.२३ ऑक्टोंबर २०२३ सोमवार रोजी दुपारी ४:०० वाजताच्या सुमारास
मा.आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांच्या उपस्थितीत शहरातील माहेश्वरी भवन येथे संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने केली असुन लकी ड्रॉ सोडतीच्या माध्यमातून न.प.तेल्हाराच्या पहिल्या स्मार्ट श्रीमती २०२३ च्या महिला विजेत्यांची निवड हि ईश्वर चिट्ठी च्या माध्यमातून लहान नऊ कन्यांच्या हस्ते करण्यात आली त्या स्मार्ट श्रीमती तेल्हारा विजेत्या महिलांना एक चांदीचे नाणं व एक पैठणी अशा स्वरूपाचं नियोजीत बक्षिस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
तेल्हारा शहर कचरा मुक्त करण्याच्या उद्देशाने तसेच शहरातील घरगुती ओला व सुका कचरा हा वेगवेगळा संकलित करण्याच्या उद्देशाने नगरपरिषद तेल्हारा ने १ ऑक्टोबर रोजी “स्मार्ट श्रीमती तेल्हारा” हा उपक्रम सुरू केला. न.प.तेल्हारा चे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी सतीश गावंडे यांच्या संकल्पनेतून स्मार्ट श्रीमती तेल्हारा हा उपक्रम तेल्हारा नगर परिषदेच्या ईतीहासात नोंद व्हावी असा हा उपक्रम शहरांमध्ये प्रथमच राबविण्यात येत आहे. दैनंदिन निर्माण होणारा घरघुती कचरा हा मुख्यतः गृहिणी मार्फत गोळा करण्यात येतो,हीच बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी गृहिणींना न.प.च्या घंटागाडी मध्ये ओला व सुका असा वेगवेगळा कचरा वेगवेगळ्या डस्टबिन मधून द्यायचा आहे आणि घंटागाडी वाल्यांकडून अश्या गृहिणींना दररोज 1 कूपन देण्यात येईल. अशाप्रकारे दर पंधरा दिवसांचे पंधरा कूपन ज्या गृहिणी न प कार्यालयात जमा करतील अशा गृहिणींना लकी ड्रॉ द्वारे नवी कोरी पैठणी व चांदीचं नाण जिंकण्याची संधी मिळेल. लकी ड्रॉ चा कार्यक्रम हा दर पंधरा दिवसांनी होईल व तीन महिन्यांनी सर्व सहभागी गृहिणींचा मेगा ड्रॉ निघेल. या मेगा ड्रॉ मध्ये गृहिणींना टीव्ही, फ्रिज,वाशिंग मशीन अशा प्रकारची बक्षीस जिंकण्याची संधी मिळेल.
सदर स्पर्धेमध्ये शहरातील शेकडो महिलांनी आपला सहभाग नोंदविला.सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मा.आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांनी भूषविले. प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र रावणकर अकोट बीजेपी अध्यक्ष हे असुन.मा.आमदार प्रकाशभाऊ भारसाकडे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नगर परिषदेने हा उपक्रम राबवल्याबद्दल त्यांचे कौतुक केले तसेच मुख्याधिकारी व न प कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
न.प.तेल्हारा च्या प्रभाग निहाय निवड झालेल्या भाग्यवान स्मार्ट श्रीमती तेल्हारा च्या विजेत्यां महिलांची नावे पुढील प्रमाणे आहेत
मेघा विजय इंगळे,कांता गजानन भाकरे,पायल राहुल सोनटक्के,पुष्पा स. राऊत
,शोभा डी. सोनटक्के
,पूजा निलेश खारोडे
,शिलाताई देवेंद्र वरणकार
,सरिता शर्मा
,पुष्पा राजेश सपकाळ
,लता बाळकृष्ण मार्के
यानुसार उपस्थित भाग्यवान विजेत्या स्मार्ट श्रीमतींना मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पैठणी व चांदीचे नाणे बक्षीस देण्यात आले.
या कार्यक्रमामध्ये मान्यवरांचा परिचय व उत्कृष्ट सुत्रसंचालन नगर परिषदेचे कर्मचारी शंतनु वक्ते यांनी केले. कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशासक तथा मुख्याधिकारी सतीश गावंडे यांनी केले. प्रस्तावनेत त्यांनी गृहिणींना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले ,यावेळी कार्यक्रमास मंचावर सौ.मोनिका वाघ ,गजानन उंबरकर, ओम सुईवाल, स्वाती गंभीरे,मनीषाताई देशमुख ,विजय देशमुख, रवी गडोदिया ,सुनील राठोड, संगीता विजय देशमुख,कल्पना पोहणे , प्रतिभा बरिंगे,अनिल पोहणे गणेश ईंगोले व इतर मान्यवर उपस्थित होते या लकी ड्रॉ ,सोडतीच्या कार्यक्रमाला शहरातील असंख्य महिला, पत्रकार बांधव,व्यापारी वर्ग तसेच नगर परिषदेचे कर्मचारी कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button