
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ता.प्रतिनिधी .तेल्हारा/अडसूळ दि.१३
महाराष्ट्राचे विख्यात खगोल शास्त्रज्ञ प्रभाकर दोड यांनी अडसुळ ता तेल्हारा येथील मातोश्री मैनाबाई ढोणे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांना भूगोल आणि खगोलची शास्त्रा बद्दलची अनमोल अशी माहिती दिली. दि.१० ऑक्टोबर रोजी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक अरविंद गिरे सर होते तर शिवराजे जामोदे कविराज, अरुण कुमार काळे , सौ सुनीता गिरे मॅडम, गणेश मानमोडे, अमित गिरे सर, अक्षय दहे, पुरुषोत्तम इंगोले, गणेश नागडे, विठ्ठल महाले यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती.
खगोलशास्त्रज्ञ प्रभाकर दौड यांनी रात्री दुर्बिणीच्या साह्याने विद्यार्थ्यांना विविध ग्रह व ताऱ्यांचे दर्शन घडविले. या ग्रामीण भागात प्रथमच आकाश दर्शनाचा हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. आकाशातील ग्रह तारे पाहून त्यांची ओळख या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना झाली. याप्रसंगी गावकरी तसेच विद्यालयाचे माजी विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. सूर्य, चंद्र, तारे ,पृथ्वी , शनि, बुध ,गुरु ,बुध शुक्र ,ध्रुवतारा सप्तर्षी या सर्वांची अतिशय महत्त्वाची ही माहिती विद्यार्थ्यांना मिळाली. प्रत्यक्ष ग्रह तारे पाहताना विद्यार्थी रोमांचित झाले.
विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक तसेच कर्मचारी यांनी शास्त्रज्ञ प्रभाकर दौड यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी मोठ्या प्रमाणात विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंद आदी उपस्थित होते



