बुलढाणामहाराष्ट्र
न.प.तेल्हारा मार्फत शहरामध्ये “स्वच्छता ही सेवा” अभियान

न.प.तेल्हारा मार्फत शहरामध्ये “स्वच्छता ही सेवा” अभियान
(स्वच्छता पंधरवडा निमित्त सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षा साहित्य वाटप)
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,
तेल्हारा ता.प्रतिनिधी.
तेल्हारा.दि.०३.
स्वच्छ भारत अभियान २.० (ना.) अंतर्गत केंद्रीय गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय (MoHUA), भारत सरकार यांनी आयोजित केलेल्या इंडियन स्वच्छता लीग २.० अंतर्गत "स्वच्छता पंधरवडा" व "स्वच्छता ही सेवा अभियान" ही मोहिम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून "इंडीयन स्वच्छता लीग २.० (Indian Swachhata League २.०) व स्वच्छता पंधरवडा" निमित्त "सफाई मित्र सेवा व सुरक्षा'' अंतर्गत दि.०२/१०/२०२३ रोजी नगर परिषद तेल्हारा येथे सफाई कर्मचार्यांना सुरक्षा साहित्य वितरण करण्यात आले त्यामध्ये मास्क, हॅण्ड ग्लोव्हज,गणवेश,साबण,जॅकेट,गम बूट,ई.सुरक्षा साहित्याचा समावेश आहे.
यावेळी तेल्हारा नगरपरिषद चे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.सतिश गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकृष्ण पोहरकर,पाणीपुरवठा व स्वच्छता अभियंता निनाद आचार्य,करनिर्धारण अधिकारी मयुरी जोशी यांच्या हस्ते सफाई कामगारांना सन्मान प्रमाणपत्र व साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी सर्व न.प.अधिकारी,कर्मचारी,कामगार,आदी उपस्थित होते.



