महाराष्ट्रराजकीय

दत्तगुरु मंडळाचा दहीहंडी उत्सव सोहळा जल्लोषात साजरा

येणाऱ्या सर्व सणांमधून सामाजिक एकतेचे प्रदर्शन करावे – आ ॲड आकाश फुंडकर.

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

खामगाव::- खामगांव शहरातील घाटपुरी नाका परिसरातील दत्तगुरु मंडळ व्दारा आयोजित दहीहंडी उत्सव सोहळा खामगांव विधानसभा मतदार संघाचे लाडके आमदार अँड. आकाश फुंडकर यांच्या उपसस्थ‍ितीत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी आमदार ॲड आकाश फुंडकर म्हणाले की, येणारे सर्व सण हे सामाजिक एकतेचे प्रदर्शन करणारे असावे सर्व मंडळाने अशा प्रकारे नियोजन करावे.

  जिल्ह्यात सर्वात मोठा दहीहंडी उत्सव सोहळा खामगाव येथे घाटपुरी नाका येथे दत्तगुरु मंडळाचे वतीने आयोजित करण्यात येतो. दरवर्षप्रमाणे यंदाही दत्तगुरु मंडळाचे वतीने दहिहंडी उत्सव सोहळा आयोजित केला होता.  या दही हांडी उत्स़व समितीचे अध्यक्ष यश आमले यांनी नियोजन पध्दतीने  दुपारी तीन ते सहा वाज पर्यंत भगवान श्रीकृष्णाचे गीतावर भजन, नंतर परिसरात पालखी सोहळा आयोजित केला होता. सायंकाळी या ठिकाणी सामुहिक हनुमान चालीसा पठन करण्यात आले. या सर्व सोहळयात संपुर्ण परिसरातील युवकांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता व कार्यक्रम यशस्वी केला.

यावेळी महाआरती झाल्यावर दत्तगुरु मंडळाच्या गोविंदांचा दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला. खामगांव शहरातील सर्व मान्यवरांनी या दहिहांडी उत्सवाला भेटी दिल्या. यावेळी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांचा दत्तगुरु दहीहांडी उत्स़व समितीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी दत्तगुरु मंडळाचे अध्यक्ष ओम शर्मा, दहीहांडी उत्सव समितीचे अध्यक्ष यश आमले यांनी आमदार ॲड आकाश फुंडकर यांचा हार घालून सत्कार केला. या सोबतच कार्यक्रमास आलेले मान्य़वऱ भाजपा सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेश संयोजक सागरदादा फुंडकर , उद्योजक संतोष देशमुख यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी घाटपुरी नाका परिसरातील ज्येष्ठ नागरिक शेखरकाका शेवळकर,भास्क़रकाका चेंडाळणे, दत्तगुरु मंडळाचे अध्यक्ष ओम शर्मा, दहीहंडी उत्सव समितीचे अध्यक्ष यश आमले, आदींची उपस्थिती होती. मोठ्या उत्साहात दहीहंडी उत्सव सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. हा सोहळा पाहणयासाठी शहरातील हजारो नागरिकांनी उपस्थितीती दर्शविली. रात्री १० वाजता दत्तगुरु मंडळाच्या गोविंदा पथकांनी दहीहंडी फोडल्या नंतर गोपाळकाला प्रसादाचे वितरण करण्यात आले व या उत्सवाची सांगता करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button