वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

शेगांव तालुक्यातील जिल्हा कार्यकारणी तसेच तालुक्यातील कार्यकारणी, शहर कार्यकारिणी तालुका व शहर महीला आघाडी व युवा आघाडी तालुका व शहर सर्कल कार्यकारणी, सर्व ग्राम शाखा.अध्यक्ष, शहर वार्ड शाखा.अध्यक्ष शेगांव, तथा ग्रामीण व शहर विभागातील सर्व वंचित बहुजन आघाडी चे आजी माजी पदाधीकारी यांना जय भिम जय शिवराय आपणास सुचित करण्यात येत आहे आहे की सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगांव येथील रुग्णालयातील सिटीस्कॅन व सोनोग्राफी मशीन हे गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे त्यामुळे गरजु रुग्णांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे एकीकडे शासनाकडून सर्व आरोग्य उपचार मोफत आहे असा मोठा गाजावाजा करून शासन जनतेला सांगत आहे. व आता कोणालाच दवाखान्यात पैशांची गरज पडणार नाही असे सांगीतल्या जाते परंतु सरकारी रुग्णालयातील सिटीस्कॅन व सोनोग्राफी मशीन बंद पडली आहे.त्यामुळे शेगांव शहरातील व ग्रामीण भागातील गोरोदर महीला व इतर आजार असणार्या सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास सहन करून आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे हया दोन्ही मशीन लवकरात लवकर सुरू कराव्यात हया मागणी साठी वंचित बहुजन आघाडी तालुका शेगांव व शहर यांच्या संयुक्त विद्यमाने निवेदन देण्यात येणार असून आपण न चुकता.दी.१२/०९/२०२३ रोज मंगळवार ठीक ११.००वाजता सईबाई मोटे उपजिल्हा सामान्य रुग्णालय शेगांव येथे हजर राहावे ही नम्र विनंती
*आपले विनीत*
वंचित बहुजन आघाडी तालुका शेगांव
वंचित बहुजन आघाडी शेगांव शहर
वंचित बहुजन महिला आघाडी तालुका व शहर
वंचित बहुजन युवा आघाडी तालुका व शहर



