महाराष्ट्रसामाजिक

सामाजिक कार्यासाठी समाज बांधवानी सदैव तत्पर असावे ..अमोल कल्याणकर

: संत नरहरी सोनार महाराज मंदिराचा भुमिपुजन सोहळा

: परिसरातील संत महंत आणि मान्यवरांची उपस्थिती

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – आजचा युवक भरकटत चालला आहे.केवळ आपला आणि आपल्या कुटुंबाचा विचार न करता व्यापक दृष्टिकोन ठेवून समोर येण्याची गरज आहे आणि आपापसातील मतभेद बाजूला सारून सामाजिक कार्यासाठी समाज बांधवानी सदैव तत्पर असायला पाहिजे असे प्रतिपादन संत नरहरी सोनार संस्थेचे उपाध्यक्ष अमोल कल्याणकर यांनी केले ते मालेगाव येथिल नागरदास रोड वरील हॅपी फेसेस स्कुल च्या बाजूला श्री संत शिरोमणी नरहरी सोनार महाराज व विठ्ठल रुख्मिणी मंदिर निर्माण होत आहे.त्या मंदिराचा भुमिपुजन सोहळ्यानिमित्य बोलत होते. हा कार्यक्रम विविध संत महंत आणि मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये भक्ती मय वातावरणात शुक्रवार दि ८ सप्टेंबर रोजी संपन्न झाला आहे.
संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचे भव्यदिव्य मंदिर मालेगाव येथे निर्माणाधिन असून या मंदिराचा भूमिपूजन सोहळा दि ८ रोजी संपन्न होत आहे.सदर भूमिपूजन सोहळा हा पुजारी शशिकांत देव महाराज, वाशिम यांच्या पौरोहित्या खाली पार पडला असून ,प पू शांती पुरी बाबा सिद्धेश्वर संस्थान येवता, विदर्भ रत्न तथा रामायनाचर्य ह.भ.प. संजय बाबा पाचपोर ह.भ.प विजय महाराज शास्त्री
यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला आहे.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ह.भ.प केशव बाबा सुरुशे नागठाणा हे होते तर प्रमुख उपस्थिती म्हणून ह.भ.प रमेश महाराज वाढनकर,ह भ प सुधाकर देवळे तसेच अध्यक्ष व विश्वस्त मंडळ श्री विश्वकर्मा प्रभू संस्थान शिरपूर, तथा सोनार समाजातील मान्यवर मंडळी उपस्थित होती. सुरवातीला संत नरहरी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन झाले त्यानंतर महाराजांच्या आणि मान्यवरांच्या हस्ते कुदळ मारून विधिवत भूमिपूजन केले.कार्यक्रमाचे संचालन डॉ पूजा भांडेकर व कुमुद अस्टोनकर यांनी केले. आणि शेवटी महाप्रसाद वाटप करण्यात आला . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सोनार समाजातील सर्व पुरुष महिला आणि तरुण वर्ग आणि कार्यकर्ते यांनी प्रयत्न केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button