गुन्हेगारीबुलढाणामहाराष्ट्र

रेती माफी यांचे’ बिहार राज’! टिप्पर अंगावर घालून नायक तहसीलदारसह दोन तलाठ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
जिल्हा प्रतिनिधी
उषा इंगळे बुलढाणा

रेतीचे घाट बंद असल्याने बेसुमार पैसा कमावण्यासाठी रेतीमापिया वाटेल तो मार्ग पत्करत आहेत. त्यांचे’बिहार राज’एवढे बोकाळले आहे की , अधिकारी असो वा कर्मचारी, जो रेती तर करीच्या मध्ये येईल त्याला थेट रेतीच्या टिप्परने उडवून यम सदनी पाठविण्याची राक्षसी वृत्ती अंगीकारली आहे. त्याचा प्रत्यय ७ सप्टेंबरला इसरूळ, शेगाव आटोळ ते देऊळगाव घुबे मार्गावर आला. इसरून जवळ रेतीने भरलेले टिप्पर थांबवण्याचा इशारा करणारे चिखलीचे नायब तहसीलदार. डॉ संतोष मुंढे यांच्यासह दोन तलाठ्यांच्या अंगावर टिप्पर चालकाने वाहन घातले. मात्र, क्षणात सर्वजण रोडच्या बाजूने पळाल्याने त्यांचा जीव वाचला. त्यानंतर महसूलच्या टिमने पाठलागाचा थरार सुरू केला. त्याच दरम्यान मागून आलेल्या तस्करांच्या बोलेरो जीपने पथकाचा पाठलाग करून पुढे वाहने अडवले. तेवढ्यात पेपर चालकाने भर रस्त्यात टिप्पर मधील रेती उथलवून रस्ता बंद केला. दरम्यान, टिप्पर चालकास वाहनसह पलायन करण्यास मदत करणाऱ्या बोलेरो एकदा नायक तहसीलदारांच्या अंगावर जीभ घालून हल्ल्याचा प्रयत्न केला. या गुंडाशाही विरोधात चिखली तहसीलचे नायब तहसीलदार डॉ. संतोष मुंढे यांनी दिलेल्या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी चिखलीच्या गोरक्षण वाडीतील रहिवासी सचिन आत्तार, टिप्पर चा चालक तसेच अन्य तीन अज्ञात रेती स्तर कर अशा पाच जणांविरुद्ध बांधविकलम ३०७,३५३,३७९,३२३,३४ अन्वये गुन्हे दाखल आहे. रेतीच्या टिप्पर वर कारवाई करण्याचे आदेश चिखलीचे तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी दिल्याने चिखली तहसीलचे नायब तहसीलदार डॉ. संतोष मुंढे(३८) हे चिखली भाग 2 चे तलाठी योगेश भुसारी व एकलारा तलाठी निलेश सोनवणे यांना सोबत घेऊन त्यांचे खाजगी वाहन इनोव्हा (क्रमांक एम एच-४६- डी ५५११)ने ७ सप्टेंबरला सकाळी पावणे अकरा वाजता कर्तव्यावर निघाले. चिखलीकडून इसरूळकडे जात असतानाच विना नंबरचे एक रेतीचे भरलेले पिवळ्या रंगाचे टिप्पर आले. या चालकास थांबवण्याचा इशारा केला असता चालकाने टिप्पर जोरात दाबून तिघांच्याही अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात तिघेही रस्त्याच्या बाजूला पळाल्याने बचावले. यानंतर महसूलच्या पथकाने टिप्पर चा पाठलाग सुरू केला. इसरूळ , शेळगाव आटोळ मार्गाने मार्गाने चालकाने बेदरकारपणे टिप्पर चालवले. यामुळे समोरून येणाऱ्या चार चाकी व दुचाकी वाहनधारकांच्या जीवित वास धोका निर्माण झाला होता.चालू वाहनातून रेती टाकली रस्त्यावर अधिकारी टिप्पर चा पाठलाग करत असल्याची बाब समजल्यानंतर बोलेरो वाहन (क्रमांक एम एच ४७-डब्ल्यू-३८२८) पाठलाग करणाऱ्या महसूल पथकाच्या गाडीमागे लागले. यातील सचिन अत्तारणे इनो वाला कट मारून ओव्हरटेक करत त्यांची गाडी पुढे जाऊन अडवली आणि टिप्पर चालकास रेती रस्त्यावरच खाली करण्यास सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button