तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे कावडधारी भाविक भक्त भगवान शंकराच्या महाआरती मध्ये तल्लीन

तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे कावडधारी भाविक भक्त भगवान शंकराच्या महाआरती मध्ये तल्लीन
( हर हर महादेव च्या गजराने माळेगाव बाजार झाले भक्तिमय)
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
तेल्हारा तालुका प्रतिनिधी
-व्ही एम घोडे
माळेगाव बा./तेल्हारा दि ४. तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रावण महिन्याचे औचित्य साधून प्रत्येक सोमवारी कावडधारी व भाविक भक्त मोठ्या भक्ती भावाने पवित्र नद्यांमधुन पाईवारी करुन कावडीमध्ये जल भरुन आणतात व भगवान शंकराला जलाभिषेक करतात.हिंदु संस्कृती मधील पवित्र मास म्हणजे हा श्रावण महिना .दि 4 ऑगस्ट 2023 ला श्रावण महिन्याचा हा तिसरा सोमवार होता त्या निमित्य माळेगाव बाजार येथे कावड यात्रा काढण्यात आली होती या यात्रेदरम्यान भगवान शंकराची महाआरती करण्यात आली होती यावेळी भाविक भक्त भगवान शंकराच्या आरती मध्ये तल्लीन झाले होते .हा श्रावण सोमवार अतिशय भक्तीभावाने साजरा करण्यात आला. या कावड यात्रेमध्ये भगवान शंकर कावड मंडळासह चंपा माता कावळ मंडळ आणि युवकांनी सहभाग घेतला होता. हर हर महादेव च्या गजराने माळेगाव नगरी भक्तिमय होऊन गेली होती. खिरोडा गावा पासून कावड यात्रेस प्रारंभ होऊन संपूर्ण गावातून वाजत गाजत कावळ यात्रा निघाली महादेव संस्थान मंदिर येथे महादेवाला जलाभिषेक करून कावड यात्रेचा समारोप करण्यात आला श्रावण महिन्याचे विशेष महत्त्व -श्रावण महिना हा सर्वात शुभ महिना मानला जातो भक्त भगवान शिव आणि देवी पार्वतीची प्रार्थना करतात भाविक भक्त प्रत्येक श्रावण सोमवारी उपवास करत असतात माळेगाव मधील शिवभक्तांसाठी गजानन महाराज संस्थान माळेगाव बा.मार्फत ठिकठिकाणी चहापाण्याची तसेच फराळाची व्यवस्था करण्यात आली होती.



