जळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीयसामाजिक

जळगावचे रस्ते कोण बनवणार?मोदी की शहा?

जळगावचे रस्ते कोण बनवणार?मोदी की शहा?

जळगाव शहरातील रस्ते बनवण्याची लायकी ना आमदारांची,ना नगरसेवकांची.म्हणून एड संजय सिंग पाटील म्हणाले की,येथे आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनीच आले पाहिजे.त्यांनीच हे रस्ते बनवून परत दिल्लीत गेले पाहिजे.येथले आमदार दारू विकून पोट भरतात.नगरसेवक इकडून तिकडून हात मारून पोट भरतात.रस्ते बनवण्याची बुद्धी त्यांचेकडे नाहीच.ते चिखलातून उगवलेले कमळ आहेत.म्हणून हा चिखल जतन करून ठेवला आहे. येथे नगरसेवक कापसेंची शाळा आहे‌.नांव पण सुंदर आहे.स्वामी समर्थ! आणि नागरिक असमर्थ!! पोरं शाळेत आणि बाप गटारीत.त्या शाळेतील संडास चे पाणी असे रस्त्यावर वाहात आहे.व्वा रे नगरसेवक! नगरसेवक आहेत कि नगरभक्षक?तरीही येथील मतदारांनी त्याचे कुटुंबातील तीन नगरसेवक निवडून दिले आहेत.किती पुण्यवान असतील ही माणसे?किती गुणवान असतील हे मतदार ? छत्रपती शिवाजी महाराज,या मतदारांना सद्बुद्धी द्या. जळगाव शहराचे हे भयंकर चित्र बदलण्याची गरज आहे.म्हणून आधी नगरसेवक बदलण्याची गरज आहे.आत्ताचा नगरसेवक पुन्हा नकोच!कितीही पैसे दिले तरीही नकोच!उलट त्यांनी दिलेले आधीचे पैसे परत करू.हरामाच्या कमाईचे पैसे असा सत्यानाश करतात.पुन्हा नकोच असा सत्यानाश!….

शिवराम पाटील महाराष्ट्र जागृत जनमंचजळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button