बुलढाणामहाराष्ट्र

जळगाव जामोद येथे पाहीजे/फरार असलेले तीन आरोपी जेरबंद

जळगाव जामोद येथे पाहीजे/फरार असलेले तीन आरोपी जेरबंद

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे दिनांक 1 आगस्ट 2023 रोजी पोलीस स्टेशन जळगाव जामोद येथे मा. पोलीस अधिक्षक बुलडाणा यांच्या आदेशानुसार कोम्बीग आपरेशन राबविण्यात आले. या दरम्यान जळगाव जा. पोलीसांनी अनेक दिवसापासुन मा. न्यायालयास पाहीजे असलेले आरोपी शोधमोहीम राबविली. यादरम्यान 1)भांदवी 324 ,323 चे गूनह्यात पाहीजे असलेला आरोपी नामे अनील रमेश कटारे वय 32 रा. अकैला खुर्द 2)भांदवी 380 461 भादवी तसेच 325 मध्ये पाहीजे असलेला निगराणी बदमाश आरोपी नामे देवीदास दामा मूंडे वय 32 वर्ष तसेच 3) भांदवी 379 429 मध्ये पाहीजे असलेला आरोपी नामे भागवत विठ्ठल मुंडे वय 35 यांना गूप्त बातमीच्या आधारे ताब्यात घेण्यात आले. सदरची कारवाई पोनी दिनेश झामरे यांच्या मार्गदर्शनात सपोनी पांडुरंग इंगळे , पोहेका प्रकाश माटे, नापोका सुनील वावगे ,पो का प्रेम पवार व अनंता गावंडे यांनी केली. ___________________________

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button