खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रसंपादकीय

माणसांशी वैचारिक नाते !

माणूस हा एकमेव प्राणी विचार करतो.म्हणून त्याला वैचारिक धाग्याने बांधता येते.असा माझा समज आहे.माझे मत,त्यांचे मत,अनेकांचे मत यात एक सत्याचा धागा असेल तर आम्ही त्या धाग्याने बांधले जाऊ शकतो.इतर प्राण्यांचे नाते आहार,विहार आणि अभिचार यातून निर्माण होते.माणूस यांचे नाते सुद्धा आहार,विहार आणि अभिचार यातून निर्माण होते.पण ते गरजेपुरते अल्पकालीन ठरते. माणूस विचारातून नाते निर्माण करतो.म्हणून तर पल्युटो, सॉक्रेटिस,सेक्सपियर,, कालिदास,बुद्ध, गांधी हे सुद्धा माझे नातेवाईक वाटतात.ते इतके जवळचे वाटतात कि,आज आपण त्यांचेशी बोलतो, चर्चा करतो.
कौरव पांडवांचे नाते अभिचारातून निर्माण झाले होते.पण संपत्ती साठी तुटले.उद्धव व राज यांचे नाते विचारातून नसल्याने ते सुद्धा तुटले.शरद पवार व अजित पवार यांचे नाते सुद्धा संपत्ती मुळे तुटले.अशी अनेक नाती तुटली.तुटत असतात.तुटतील.पण विचारांचे नाते कधीच तुटणार नाही.त्याला स्थळ,काळ,नाळ चे बंधन नसते.
मला वाटते लोकशाही, त्यासाठी संविधान, त्यासाठी मतदान हे वरकरणी आहार, विहार,अभिचार साठी वाटत असले तरीही ते समाज धारणाचे विधी आहेत.जसा धर्म असतो.धर्म सुद्धा समाजधारणेचा विधी असतो.येथे आपण विचारातून जोडले जातो.मला राम, कृष्ण,बालाजी, विठ्ठल, साईबाबा भेटायला बोलवत नाहीत.तरीही मी घर दार बायको पोरं टाकून त्यांना भेटायला जातो.आईबापाच्या श्राद्धाला केस न कापणारी माणसे बालाजी कडे स्वताहून केस कापून देतात.मुला बाळांसोबत कधीही हात पाय न हवलणारा बाबा पंढरपूर जातांना नाचतो.तसेच आपण लोकशाही, संविधान, मतदान सुद्धा वैचारिक धाग्यातून निर्माण केले आहे,वापरत आहोत.ते सुद्धा टिकवणे खूप गरजेचे आहे.जितका धर्म.धर्म ही संकल्पना आहे.पण इतकी शाश्वत बनली आहे की,काही केल्या नष्ट होत नाही.कितीही टिका केली तरीही बाधीत होत नाही.कोणीही तोडून फेकली,अव्हेरली,हेटाळली तरीही तशीच टिकून आहे.कारण त्यात वैचारिक धागा आहे.हा धागा प्रत्येक मन, मेंदूतून ओळला गेलेला आहे. मन मेंदू प्रत्येक माणसाला आहे.मला वाटते आपले म्हणणे ,मांडणे ,लिहिणे,बोलणे याच मन मेंदूतून आरपार गेले पाहिजे.तोच प्रयत्न मी रोज करीत आहे.माझ्या समोर द्विपाद सस्तन प्राणी,व्हर्टाब्रेट सिमेंट्रीकल इरेक्टेड अनिमल आहे .तो माणूस आहे.मला त्या माणसाशी वैचारिक नाते जोडायचे आहे.आहार, विहार, अभिचारातून निर्माण झालेली नाती आता धुसर,विरळ,पुसट, कमजोर होऊ लागली आहेत.आता विचारातून शाश्वत नाती जोडत आहे.आपण या आधी कधीही न भेटलेली माणसे, एकमेकांना न पाहिलेले माणसे संवाद करतो.असे लाखो वाचक माझ्याशी जुळले गेले आहेत.मला सुचवतात.काका,लिहा.काका बोला.ज्यांचे स्थळ,नाळ मला माहित नाही.वैचारीक नाते स्थळसापेक्ष आहे.नाळसापेक्ष आहे .कदाचित हेच नाते काळसापेक्ष टिकून राहिल.
महर्षी वाल्मिक ऋषी, महर्षी व्यास ऋषी जरी अनेक काळापुर्वीचे असले तरीही मी त्यांना विसरू शकत नाही.जो पर्यंत माझे मन आणि मेंदू शाबूत आहे, तोपर्यंत!राम , कृष्ण, बुद्ध, गांधी अशा विभुती तर त्यांचा द्वेष करूनही विसर पडत नाही.रामाचे मंदिर पाडले तरीही राम मनातून जात नाही.गांधीजींचा खून केला तर गांधींजींचा विसर पडत नाही.का?या व्यक्ती होत्या.ते विभुती बनले.त्या प्रतिभा होत्या.ते प्रतिमा बनले.त्यांचा आणि माझा एक वैचारिक बंध आहे.एक धागा आहे.विचारप्रवाह आहे.त्याच विचारप्रवाहात मी पोहत आहे.मी विचार पर्यटन करीत आहे.मरे पर्यंत.आणि मरणोपरांत सुद्धा!

… शिवराम पाटील
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button