महाराष्ट्र

उध्दव़ ठाकरे हे वैफल्य़ग्रस्त़ झाले आहेतउध्दव़ ठाकरेंचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात कलंकित -आ.ॲड.आकाश फुंडकर

  स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे

महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत अनेक भ्रष्टाचार झालेत परंतु प्रेतांना ठेवण्यासाठी असलेल्या “बॉडी बॅग” चा घोटाळा हा उध्द़व ठाकरेंच्या कार्यकाळात झाला हा भ्रष्टाचाराचा अत्यंत खालचा व हिन दर्जा आहे. हा महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वारसाला कलंक आहे.
काल नागपूर येथे झालेल्या भाषणात उबाठा सेनेचे उध्द़व ठाकरे यांनी मा.देवेंद्रजी फडणवीस यांच्यावर टिका करतांना, वस्तुस्थिती विसरुन टिका केली. देवेंद्रजीच्या कार्यकाळात कधीही त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्या गेले नाहीत. डबघाईस गेलेला महाराष्ट्र 5 वर्षाच्या कार्यकाळात प्रगतीशिल राज्यांच्या रांगेत आणले. शेतकऱ्यांसाठी विकासाचा दृष्टीकोन ठेऊन “जलयुक्त शिवार” योजना आणली ती देशाच्या इतिहासात उत्कृष्ट़ योजना ठरली आहे. त्यावर याच उध्द़व ठाकरेंनी भ्रष्टाचाराचे आरोप केले. परंतु त्यांच्या स्व़त:च्याच कार्यकाळात ते आरोप सिध्द़ करु शकले नाही.
उध्द़व ठाकरेंनी सत्तेत येताच राज्यांच्या विकासासाठी अत्यंत महत्वाचे समजल्या जाणारे सर्व प्रकल्प़ योजना थांबविल्या. राज्यात अधिकाऱ्यामार्फत मुंबई दरमहा 100 कोटी वसूल करण्याचे कार्यक्रम राबविण्यात आले. उद्योगपतीच्या घरासमोर स्फोटक ठेऊन त्यांच्यात दहशत निर्माण करणे, राज्यातील जनता कोरोना सारख्या महामारीच्या विळख्यात सापडली असतांना मुख्यमंत्री पदी विराजमान असतांना उध्दव़ ठाकरेंनी घरात बसून, कोमट पाणी पिण्याचे सल्ले देणे हे आतापर्यंत महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीतील सर्वांत खराब कार्यकाळ समजला जाईल. असे असतांनाही एक उत्कृष्ट़ कारर्किद गाजवलेल्या मा.देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे भुषण आहेत.
त्यामुळे वैफल्य़ ग्रस्त़ झालेले उध्द़व ठाकरे यांनी आपली उद़वीग्नता घरी बसून घालवावी. विनाकरण कर्तत्ववान नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करुन त्यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्ऩ करु नये. आपल्या हातून सर्व गेल आहे. आपला एक एक माणूस आपल्याला सोडून जात आहे असे असतांनाही त्यातून शिकण्याऐवजी प्रत्येक जाणाऱ्याला तो कसा बदमाश होता हे जनतेला सांगून त्यांची बदनामी केल्या जात आहे. जनतेला कोण चांगल कोण बदमाश हे कळून चुकल आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button