श्री. राहुल जी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळे व* *बिस्किटे वाटप*

*श्री. राहुल जी गांधी यांच्या वाढदिवसा निमित्त रुग्णांना फळे व* *बिस्किटे वाटप* कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक कारंजा लाड — एकीकडे नरेंद्र मोदी व अमित शहा देशात व्देषाचे राजकारण करत असताना दुसरीकडे आदरणीय श्री राहुल जी गांधी एक व्देष मुक्त भारत घडविण्यासाठी ‘ नफरत छोडो भारत जोडो ‘ च्या माध्यमातून पदयात्रा काढुन जनतेशी संवाद साधत आहेत. मोदी शहा ह्या जोडी ने देशात भीती चे वातावरण निर्माण केले आहे याउलट राहुल गांधी ह्यांना देशात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवावयाची असुन देशातील जनतेच्या मनात आपसात जी व्देषाची भावना आहे ती नष्ट करायची आहे आणि ह्यासाठीच राहुल गांधी यांनी स्वतः ला देशासाठी अर्पण केले आहे अश्या ह्या समस्त जनतेचे व कांग्रेस चे लोकप्रिय लाडके नेते आदरणीय श्री राहुल जी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ व बिस्किटांचे वाटप करण्यात आले .कारंजा लाड शहर काँग्रेस कमिटी च्या वतीने ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ह्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीपभाऊ भोजराज व वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी सहकार विभागाचे चे अध्यक्ष राजाभाऊ डोणगावकर उपस्थित होते. ह्यावेळी वाशिम जिल्हा काँग्रेस सेवादलाचे जिल्हा समन्वयक संदेश जैन जिंतुरकर ,कार्यक्रमाचे आयोजक शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अमीर खान पठाण, भीमशक्ती संघटनेचे शहर अध्यक्ष प्रदिप राऊत , वाशिम जिल्हा काँग्रेस कमिटी पंचायत राज समितीचे अध्यक्ष अॅड वैभव ढगे, जाकिर खांन , शहजाद खान, सुरेश भाऊ कांबळे , अझर खांन , विनय पांडे , विशाल बोदडे , मुज्जु खांन , अमीन खांन , निलेश मनवर , एन एस यु आय चे जिल्हाध्यक्ष अक्षय बनसोड , करण सोनोने , अभि देशमुख , जावेद खान , प्रफुल्ल गवई, रिजवान खांन , गौरव करडे , अजय बांडे , शुभम बागडे , अक्षय उके, देवराव जामनिक , निलेश कवळे व रमेश रोकडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



