मा.कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा तालुका प्रतिनिधी.
अकोला.दि.11.मा. कृषिमंत्री महाराष्ट्र राज्य श्री अब्दुल सत्तार साहेब हे अकोला जिल्हा दौऱ्यावर आले असता अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये अनुदान शासनाने तत्काळ द्यावे असे निवेदन मा.कृषिमंत्री साहेबांना देण्यात आले.
मार्च महिन्याच्या शेवटी व संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी वादळी वारे व गारपिटीसह पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच अकोला जिल्ह्यामध्ये कापूस व सोयाबीन या पिकांचा देखील मोठा पेरा आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल कापूस व सोयाबीन भाव वाढीच्या अपेक्षेणे आजही घरातच आहे,खरिप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांची झालेली आर्थिक कोंडी पाहता यावर देखील सरकारने तातडीने लक्ष घालावे अशी मागणी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोकराव अमानकर यांनी मा. कृषिमंत्री श्री अब्दुल सत्तार साहेब यांच्याशी चर्चा करताना केली.
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ परिसरामध्ये मा. कृषिमंत्री यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोकराव अमानकर, काँग्रेस नेते विवेकजी पारस्कर साहेब, काँग्रेस जिल्हा महासचिव अतुल पाटील अमानकर, विलास भाऊ गोतमारे व अनिल पाटील माहोरे उपस्थित होते.



