महाराष्ट्रशैक्षणिक

न.ह.रांका विद्यालयात एस.एस.सी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न

अर्जुन आसने (जिल्हा प्रतिनिधी) बोदवड ता.बोदवड:- बोदवड येथील रांका विद्यालयात बोदवड एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मिठुलाल अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक यांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम पार पडला .यावेळी सचिव विकास कोटेचा,माजी चेअरमन अँड. प्रकाशचंदजी सुराणा,संचालक अशोक जैन,श्रीराम बडगुजर,आनंद जैस्वाल,विजयकुमार जैन,रमेश जैन ,मुख्याध्यापक पी. एम.पाटील, पर्यवेक्षक आर के .तायडे,जे.एन.माळी, गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक तसेच विद्यालयातील शिक्षक वृंद आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक उपमुख्याध्यापिका एम एस बडगुजर मॅडम यांनी केले. फेब्रुवारी २०२२ -२३ या शैक्षणिक वर्षात झालेल्या शालांत प्रमाणपत्र परीक्षेत न .ह.रांका विद्यालयातून प्रथम कु.वैष्णवी कोल्हे व कु.गायत्री तेली (९२.८०)द्वितीय कु.भारती वंजारी( ९२.६०) तृतीय कु. प्रियंका कदम (९१.४० )तसेच शेकडा ९०% पेक्षा अधिक गुण प्राप्त केलेले कु.रोशनी झिंजर, हेमंत मराठे ,कु.सृष्टी वैष्णव आदी विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा गुलाब पुष्प देऊन तसेच पेढा भरवून मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित पालकांमधून हितेश मराठे यांनी तर विद्यार्थ्यांमधून कु. गायत्री तेली व विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एम .पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
गुणवंतांचा गौरव करताना माजी चेअरमन अँड.प्रकाशचंदजी सुराणा यांनी गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांना शुभेच्छा दिल्या .प्रथम क्रमांक मिळवण्यामध्ये मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या अधिक असून त्यांनी यश मिळविले आहे. पालकांनी मुला-मुलींमध्ये भेद न करता मुलींना दिलेल्या संधीचे या मुलींनी सोने करून दाखवले व यापुढेही त्या यशाचे शिखर नक्कीच गाठतील असे प्रतिपादन केले. सचिव विकास कोटेचा म्हणाले पालकांचा ऊर भरून यावा असे हे या मुलींनी मिळवलेले यश आहे.आपल्या अध्यक्षीय भाषणात चेअरमन मिठूलालजी अग्रवाल यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.विश्वजीत सिसोदे यांनी तर आभार एस .के. राणे यांनी मानले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button