सुनील कडासने बुलढाण्याचे नवीन जिल्हा पोलीस अधीक्षक

**स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे मलकापूरला डीवायएसपी म्हणून गाजवीला होता कार्यकाळ बुलढाणा, 09 मे – नागपूर लोहमार्ग अधीक्षकपदी असलेले सुनील कडासने यांची बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पदी वर्णी लागले आहे. सारंग आवाड पुढे सीआयडी येथे उपमहा निरीक्षक म्हणून पदोन्नतीवर गेल्यानंतर बुलढाणा जिल्हा पोलीस अधीक्षक पद रिक्त होते. या पदासाठी सुनील कडासने, जी श्रीधर आणि चिन्मय पंडित यांच्या नावाची चर्चा होती. अखेर कडासने यांची शिफारस सर्वात भारी ठरली. श्री कडासने यापूर्वी जिल्ह्यात मलकापूर विभागाचे डीवायएसपी म्हणून कार्यरत राहिलेले आहेत. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याच्या बाबतीत ते कर्तव्यदक्ष होते. सन 2003-04 मध्ये त्यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांच्या नेतृत्वात काम केलेले आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडील बुलढाणा डॉ. डी. के. कडासने जिल्हा शल्य चिकित्सक होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांचे बालपण बुलढाण्यात गेलेले आहे. चौथ्या वर्गापर्यंत ते विवेकानंद गुरुकुंज मध्ये ते शिकलेले आहेत. नंतर वडिलांची बदली झाल्यामुळे त्यांना बुलढाणा सोडावे लागले होते. त्यांचे अनेक बालमित्र बुलढाणा शहरात आहेत, हे विशेष. श्री सुनील कडासने यांचे पोलीस सेवेतील दीड वर्ष राहिले आहे. अर्थातच ते बुलढाणा येथून सेवानिवृत्त होणार आहेत.



