मलकापूरमहाराष्ट्रविदर्भ
काल अवकाळी पावसानं सगळ्यांचा जीव टांगणीलालागला होता

…( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)
अनुचित घटना घडू नये याचीच काळजी होती…पण गणेश रमेश बोरवार रा काटेल यांची तीन वर्षाची चिमुकली अंगणात खेळत असताना वादळी वारा आणि पावसामुळे अंगावर भिंत कोसळून मरण पावली…घरात अठरा विश्व् दारिद्र्य…नीट घर सुद्धा नाही राहायला…त्यात हा आघात…कालच अधिकाऱ्यांशी बोलून तात्काळ पंचनामा करून नैसर्गिक आपत्ती चा धनादेश देण्याचे निर्देश दिले होते…त्यानुसार आज स्वतःडॉ सौ अपर्णा कुटे,सरपंच,मंडल अधिकारी,तलाठी व ग्रामसेवक यांच्यासह घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून घेतला व बोलवार परिवाराची सांत्वनपर भेट घेतलीअशावेळी खरंतर निःशब्द असतो आपण…पण कर्तव्य करावेच लागते…बोलवार परिवाराला हा आघात पचवण्याची परमेश्वर शक्ती देवो हीच त्या ईश्वराकडे प्रार्थना..



