आता मलकापूर विधानसभा मतदार संघात भूमिपूजनासोबत प्रत्यक्ष कामालाही सुरुवात होते – एकनाथराव खडसे

नांदुराः या अगोदर मलकापूर विधानसभा मतदार संघात विविध कामांचे मोठा गाजावाजा करीत फक्त भूमिपूजन व्हायचे नंतर ती कामे तशीच प्रलंबित राहायची मात्र आता २०१९नंतर यात बदल होऊन भूमिपूजनानंतर या मतदार संघात प्रत्यक्ष कामाला सुरुवात होउन ते पूर्णत्वास जात असल्याचे एक सकारात्मक चित्र पाहायला मिळत आहे असे प्रतिपादन विधान परिषदेचे गटनेते तथा माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी ९एप्रिल रोजी शेंबा बु येथे आयोजित ग्रामपंचायतचे भूमिपूजन व शेतकरी (बळीराजा)पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी केले गोविंद रावजी शेंबेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अंकुर सीडस प्रा लि कंपनी नागपूर यांच्या सामाजिक दायीत्व जबाबदारी (सी एस आर)निधी अंतर्गत शेंबा बु येथे ग्रामपंचायत चे भूमिपूजन शेतकरी (बळीराजा)पुतळ्याचे अनावरण ९एप्रिल ला सकाळी ११वाजता मा एकनाथराव खडसे यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आमदार राजेश पंडीतराव एकडे ,अंकुर सीडस चे माधवराव शेंबेकर यांची प्रमुख उपस्थिती होती तर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच विधीज्ञ नंदकिशोर ग खोंदले यांनी भूषविले ग्रामपंचायत साठी अंकुर सीडस चे माधवराव शेंबेकर यांनी सी एस आर फंडातून १३लक्ष रु दिले याप्रसंगी आ राजेश एकडे उपस्थितीतांना संबोधित करतांना म्हणाले की विश्वगंगा नदीवर ६साखळी बंधारे मंजूर झाले असून लवकरच त्यांचे भूमिपूजन होणार असल्याचे सांगितले तसेच ग्रामपंचायत च्या बांधकामा करीता निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख (उबाठा)वसंतराव भोजने, माजी पं स सदस्य संजयसिंग राजपूत, उपसरपंच जगन्नाथ भोपळे,मुकुंद मापारी,अरुणभाऊ अग्रवाल, गजानन खोंदले,सुधाकर वराडे,वि.ह.उज्जैनकर,बहादूर भिडे,मंगेश भिडे,अतुल सुपे,बाळासाहेब नारखेडे, रमेश सुशीर,प्रवीण भिडे,शेख जब्बार, कैलास सुशीर,विजय इंगळे,सुरेंद्र चौधरी,सुरेंद्र वराडे किशोर वाकोडे ,रामदास चौधरी ,सुभाष कवळे यांच्यासह शेंबा बु येथील गावकरी मंडळीची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती



