शेत मालाला भाव देवून नुकसान व पिक विम्याचे पैसे त्वरीत द्या

दर दिवशी शेतकरी,शेतमजुर व सर्वसामान्य जनता केंद्र सरकारच्या महागाईच्या आगीत होरपळून निघत आहे. पेट्रोल -डिझल गॅस सिलेंडरचे भाव सर्व सामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहेत. विशेष करुन शेतकऱ्यांच्या कापूस,सोयाबीन, कांदा या पिकांना भाव नाही, त्यातच अतिवृष्टी, गारपीट झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, झालेल्या पिकांच्या नुकसानीचा पीक विमा त्वरीत देण्यात यावा या शेतकऱ्यांच्या हक्काच्या न्यायासाठी बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ.श्री.राहुलभाऊ बोंद्रे यांच्या सूचनेनुसार,माननिय आमदार श्री.राजेशभाऊ एकडे यांच्या नेतृत्वात शहर व तालुका काँग्रेस कमीटीच्या वतीने तहसिल कार्यालय नांदुरा येथे आज दिनांक 27/3/2023 सोमवार रोजी जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. शेतमालाला भाव नसल्याने शेतमाल विकता येत नसून शेतीचे कामे, लग्न समारंभ, दवाखाना व इतर आर्थिक व्यवहार करणे शक्य होत नाही. केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करीत आहे, आणि एकीकडे मुद्दाम उद्योगपतीचे लालन-पालन करून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे.याचा जाब विचारण्या करीता नांदुरा शहर तालुका व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आक्रोश आंदोलन करण्यात आले या आंदोलनात भगवान धांडे अध्यक्ष नांदुरा तालुका काँग्रेस कमिटी,रवींद्र राणे अध्यक्ष शहर काँग्रेस कमिटी नांदुरा, निलेश पाऊलझगडे, केदार ढोरे, राजेशभाऊ पोलाखरे, पुरुषोत्तम झाल्टे,राजु पाटील हाडे, केशव मापारी, आकाश वतपाळ, अतुल पाटील, आशाताई कळसकार गोंड, सुनिताताई देशमुख, सौ.ज्योतिताई होनाळे, रजनीताई घुळे, मुक्ताताई सुरळकर, पुरुषोत्तम विश्वनाथ भगत,विजु ढोले,बंडू पाटील शिंगोटे, संदिप बोचरे, कैलास नामगे, धोटे साहेब, भानुदास तितरे,मंगेश भिडे, शंकरभाऊ धोडे,निलेश डिवरे, निवृत्ती हिंगणाकार, सुपडा भगत, अनिल गोरे, अमोल तांदळे, संतोष होनाळे,गणेश साबे, संदिप देशमुख,रामेश्वर काळे, विष्णु क्षिरसागर, ज्ञानेश्वर डामरे, ज्ञानेश्वर घोंगे, प्रशांत देशमुख, नारायण झाल्टे, देवनांद सरदार, पुंजाजी धाटे, सुनिल तांगडे, राजु हिवाळे,संतोष लाहुडकार, अनिल पाटील, अशोक शेजोळे, नामदेव बकाल, भिमराव गवई, ऋषीकेश देशमुख, , कस्तुराबाई डाबेराव, यमुनाताई कुटे, सुनंदा बोडखे, कस्तुराबाई दोडे,उषा पांडव, रुख्मा रासोडे, वंदना सुरळकर, संगिता पाऊझगडे, निर्मला उंबरकर, वैशाली अढाव, वनमाला तायडे,गौकर्णा होनाळे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




