महाराष्ट्रविदर्भ

नागपूर-पुणे एक्स्प्रेसह तीन गाड्यांना शेगाव स्थानकावर थांबा

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर शेगांव :- शेगाव येथे संत गजाजन महाराज यांच्या दर्शनासाठी जाणान्या भाविकांची सोय व्हावी म्हणून अकोला स्थानकावरून जाणान्या नागपूर-पुणे एक्स्प्रेससह तीन एक्स्प्रेस गाड्यांना प्रायोगिक तत्वावर सहा महिने थांबा देण्यात आला आहे. प्रवाशांच्या प्रतिसादानुसार हा थांबा कायमस्वरुपी केल्या जाऊ शकतो. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभाग कार्यालयातील सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, नागपूर-पुणे-नागपूर एक्स्प्रेस (22141 /22142) 31 मार्चपासून पुढील सहा महिने शेगाव स्थानकावर थांबणार आहे. याशिवाय गाडी क्रमांक 12422 अमृतसर-नांदेड एक्सप्रेसला 28 मार्चपासून, तर12421 नांदेड-अमृतसरएकस्प्रेसला 29 मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबा असणार आहे. गाडी क्र. 12752 जम्मुतावी- नांदेड हमसफर एक्स्प्रेस 27 मार्चपासून, तर गाडी क्र. 12751 नांदेड जम्मतावी हमसफर एक्सप्रेस 31 मार्चपासून शेगाव स्थानकावर थांबणार आहे.महाराष्ट्र एक्स्प्रेस जलंबला थांबणारगोंदिया ते कोल्हापूर दरम्यान धावणारी गाडी क्र. 11039 व 11040 महाराष्ट्र एक्स्प्रेस 27 व 28 मार्चपासून बुलढाणा जिल्ह्यातील जलंब स्थानकावर थांबणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button