महाराष्ट्रसांस्कृतिक
आज शीतला सप्तमी उद्या शीतला माता मंदिरात महिलांची गर्दी होणार

आज शीतला सप्तमी उद्या शीतला माता मंदिरात महिलांची गर्दी होणार
स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरशेगाव : होळी झाल्यानंतर सात दिवसांनी शीतला सप्तमी असते या दिवशी राजस्थानी समाजातील बहुतांश महिला आपल्या घरी स्वयंपाक तयार करून अष्टमीला सकाळीच शितला मातेचे दर्शन घेऊन तेथे नैवेद्य अर्पण करून एक दिवस आधी तयार केलेल्या जेवणाचा प्रसाद म्हणून अष्टमीला थंडझालेले जेवणच प्रसाद म्हणून घेतात शितल अष्टमीला शहरातील शीतला माता मंदिरात पहाटेपासूनच महिलांची गर्दी असते शेगावात फरशीजवळ शीतला मातेचे मंदिर असून आता काही वर्षांपूर्वी बालाजी मंदिर परिसरातही भव्य प्रतिमा स्थापित करून तेथे मंदिर तयार करण्यात आलेले आहे



