सर्वोच्च न्यायालयाचे शिरपूर जैन मंदिराचे ताले खोलण्याचे आदेश42 वर्षानंतर योगायोगवा

सर्वोच्च न्यायालयाचे शिरपूर जैन मंदिराचे ताले खोलण्याचे आदेश42 वर्षानंतर योगायोगवा
शिम जिल्हा प्रतिनिधीअजय गायकवाडमालेगांव : – वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुका येथील जैनाची काशी म्हणून ओळखले जाणारे एकमेव जैन तीर्थक्षेत्र समाजाची काशी म्हणून शिरपूर जैन येथे सुप्रसिद्ध अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर आहे प्राचीन असलेले हे अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंताचे मंदिर विश्व सुप्रसिद्ध आहे या मंदिरात जैन धर्माचे तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती असनही मूर्ती जमिनीपासून अधांतरी अंतरिक्षमध्ये आहे मागील अनेक वर्षांपासून न्यायालयीन वाद सुरू होता त्यामुळे सन एप्रिल १९८१ पासून अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराला न्यायालयीन आदेशाद्वारे सील लावण्यात येऊन दोन्ही पंथातील समाजबांधवांना मंदिरात दर्शन व पूजनासाठी मज्जाव करण्यात आला होता दोन्ही पथांतील एक एक पजारी पोलिसांच्या देखरेखमध्ये दररोज शिरपूरच्या अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिराच्या आत मागील ४२ वर्षापासून दररोज सकाळी सायंकाळी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन फक्त दिवा बत्ती व आरती करीत आहेत सध्या देशाच्या कानाकोपऱ्यात व विदेशात वास्तव्य करीत असलेल्या जैन समाजबांधवांना तसेच अन्य समाजबांधवांना मात्र एका छोट्याशा झरोक्यातून फक्त दर्शनाचा लाभ घेता येत आहे अनेक वर्षापासून बंद असलेले अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर लवकरात लवकर उघडावे व अंतरिक्ष पार्श्वनाथ भगवंतांची पूजा तसेच दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी दोन्ही पंथातील समाजबांधव आतुरतेने वाट पाहत आहेत सन १९०५ पासून दोन्ही पंथाच्या भाविकांसाठी पूजन व दर्शनाकरिता तीन-तीन तासांची वेळ निश्चित करण्यातआली होती त्यानुसार तीन-तीन तास पूजन व दर्शनाच्या वेळेची प्रथा अखंडितपणे सुरू होती अनेकवेळा खालच्या न्यायालयातून उच्चन्यायालयात उच्चतम न्यायालय प्रिव्हीकौन्सिल लंडनपर्यंत या वादाने प्रवास केला असून मागील ४२ वर्षांपासून दोन्ही पंथाचा सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू होता *अखेर अविस्मरणीय क्षन संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागर जी महाराज यांच्या तपश्चर्येने रंग दाखवला 2022 चा चातुर्मास ज्या उद्देशाने अंत्रिक पार्श्वनाथ-शिरपूर जैन येथे आयोजित करण्यात आला होता,आज तो शुभ मुहूर्त आला आहे 40 वर्षांपासून बंद असलेले अंतरीक्ष पार्श्वनाथ मंदिराचे कुलूप उघडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश आला आहे.*.शिरपूर येथील अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर उघडण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या या क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णयाचे सकल जैन समाजबांधवांकडून उत्स्फूर्त व जोरदार स्वागत होत आहे सदर निर्णयाने देश विदेशातील सकल जैनसमाज उल्हासित झाला असून वाशिम जिल्ह्यातील सकल जैन समाजबांधवांसह संपूर्ण देश विदेशातील जैन समाजात नवचैतन्य निर्माण झाले आहे अंतरिक्ष पार्श्वनाथ जैन मंदिरसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या न्यायालयीन वादाचा निकाल बुधवार २२ फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिल्यामुळे या क्रांतिकारी निर्णयाचे सर्वत्र उत्स्फूर्त स्वागत होत आहे सर्वोच्च न्यायालयाच्या या क्रांतिकारी व ऐतिहासिक आदेशामुळे जैन समाजातील तब्बल ४२ वर्षानंतरचा बाद संपुष्टात येण्याची आशा पल्लवीत झाली असून क्रांतिकारी व ऐतिहासिक निर्णयाचे सकल जैन समदायातर्फे उत्स्फर्त स्वागत होत आहे अंतरिक्ष पार्श्वनाथ मंदिर उघडून मुर्तीला लेप प्रक्रिया करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश तसेच पत्रकार परिषद घेऊन दिगंबर समाज व श्वतम्बर समाज यांची ट्रस्टीशी चर्चा घेऊन पुढील कार्यास प्रारंभ होईलबाॅक्सआज दि. 24 फेब्रुवारी 2023 ला पत्रकार परिषद घेऊन दिगंबर समाज व श्वतम्बर समाज यांची ट्रस्टीशी चर्चा घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार रितसर मंदिर खुले होणार असल्याचे सांगितले आहे.



