राष्ट्रीय पिछडावर्ग मोर्चा परिवर्तन यात्रा मालेगाव पंचायत समिती हॉल मालेगाव येथे

वाशिम जिल्हा प्रतिनिधी अजय गायकवाड) मालेगाव:–राष्ट्रीय पिछडावर्ग मोर्चा परिवर्तन यात्रा मालेगाव पंचायत समिती हॉल मालेगाव येथे दि, १७ / ०२/ २०२३ रोजी आयोजित कार्यक्रमामध्ये राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा मालेगाव तालुका अध्यक्षपदी संदीप मिटकरी तर रिसोड तालुका अध्यक्षपदी गणेश शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली या कार्यक्रमांमध्ये डॉक्टर रवी जाधव साहेब , माननीय सितारामजी वाशिमकर मराठा सेवा मराठा सेवा संघाचे तालुकाध्यक्ष माननीय अनिल गवळी सर, भारतीय बेरोजगार मोर्च्या जी. अ.मा. मंगेश कांबळे, भारतीय युवा मोर्चा चे ता. अ. मा.आकाश अवचार, विकास गवळी ओबीसी अभ्यासक, हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाची अध्यक्षता राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा चे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय चौधरी विकास पटेल यांनी केली. माननीय श्रीकांत ओव्हाळ प्रदेशाध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यांनी आपले विचार व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद पाटील पोळकर राष्ट्रीय पिछडावर्ग मोर्चा जिल्हाध्यक्ष वाशिम यांनी केले.



