मॉडेल कॉलेज मध्ये नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन*

*मॉडेल कॉलेज मध्ये नेत्र तपासणी व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन*
आज दिनांक 16/02/2023 रोजी मॉडेल कॉलेज ऑफ सायन्स आणि कॉमर्स कॉलेज मध्ये लुपिन दाईग्न स्टिक्स कल्याण यांच्या विद्यमाने नेत्र तपासणी व रक्त तपासणी करण्यात आली. मॉडेल कॉलेज नेहमीच विद्यार्थ्यांसाठी व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचऱ्यांसाठी विवीध उपक्रम जसे अयोग्य शिबिर, महिला सक्षमीकरण, विद्यार्थांसाठी प्रशिक्षण शिबिर राबवत असतात. मॉडेल कॉलेज चे प्रभारी प्राचार्य डॉ. के.एस ब्रम्हावले व एन.एस.एस प्रोग्रामर संतोष भक्त यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम यशस्वी रित्या पूर्ण करण्यात आला. या दरम्यान नेत्र तपासणी साठी अविनाश गुप्ता, संजय शर्मा, रक्त तपासणीसाठी नर्स काजळ माने, शितल पांडे, उपस्थित होते. सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तपासणी करून घेतली.



