केंद्र सरकारला जाब विचारु या!आंदोलन यशस्वी करु या!

केंद्र सरकारला जाब विचारु या!
आंदोलन यशस्वी करु या!
सप्रेम नमस्कार….
केंद्रातील मोदी सरकारने निवडक उद्योगपतींवर मेहरबानी दाखवत सामान्य माणासाचा कष्टाचा पैसा धोक्यात टाकला आहे. अदानी उद्योग समुहामध्ये एलआयसी, स्टेट बँक ऑफ इंडिया व सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांना कोट्यवधी रूपये गुंतवण्यात मोदी सरकारने भाग पाडले एलआयसीचे 29 कोटी गुंतवणूकदार व स्टेट बँकेच्या 49 कोटी खातेदारांचा कष्टाचा पैसा परत मिळेल का ? अशी भिती निर्माण झाली आहे.एल. आय. सी व स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या देशाचे गौरव आहेत. या वित्तीय संस्थामध्ये सर्वसामान्य, मध्यमवर्ग, नोकरदार, छोटे व्यापारी यांनी आपल्या मेहनतीचा पैसा गुंतवला आहे. परंतू मोदी सरकारने अदानीच्या कंपन्यामध्ये हा पैसा जबरदस्तीने गुंतवला आहे. अदानी समुहातील गैरकारभारामुळे एलआयसीच्या 39 कोटी पॉलिसीधारक व गुंतवणूकदारांचे 33 हजार कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे. तसेच भारतीय स्टेट बँक व इतर बँकानी मिळून तब्बल 80 हजार कोटी रूपयांचे कर्ज दिले आहे.काँग्रेस पक्ष कोणत्याही उद्योगपतीच्या विरोधात नाही परंतू खास उद्योगपतीसाठी नियम बदलून जनतेचा पैसा धोक्यात घालण्यास विरोध आहे. कॉंग्रेस पक्ष नेहमीच सामान्य जनतेच्या पाठीशी उभा राहिला आहे.अदानी उद्योग समुहातील गैरकाराभाची चौकशी व्हावी यासाठी कॉंग्रेस पक्ष संसदेत आवाज उठवत आहे पण रस्त्यावर उतरूनही लढा द्यावा लागणार आहे. यासाठी *सोमवार दिनांक 6 फेब्रुवारी 2023* रोजी सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीने प्रत्येक जिल्ह्यात निदर्शने करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या पार्श्वभुमीवर धुळे जिल्ह्यातील आंदोलन महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष *आ. बाबासाहेब कुणाल पाटील* यांच्या नेतृत्वाखाली व या कार्यक्रमाचे निरीक्षक *आ. के. सी. पाडवी* माजी मंत्री *दाजीसाहेब रोहिदास पाटील* , माजी खा. *बापूसाहेब चौरे,* प्रदेश कॉंग्रेस सचिव माजी आ. *डी. एस. अहिरे, युवराज करनकाळ, रणजित पावरा,* आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत जिल्हातील आंदोलन करण्यात येणार आहे.तरी जिल्ह्यातील काँग्रेसप्रेमी पदाधिकारी, कार्यकर्ता यांनी *सकाळी 10 वाजता जिल्हापरिषद समोरील एस.बी.आय बँकेजवळ* निदर्शने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे असे आवाहन धुळे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष *शामकांत सनेर* व शहर जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष *डॉ. अनिल भामरे* यांनी केले आहे.



