बुलढाणामलकापूरमहाराष्ट्रमुक्ताईनगर

रमाई योजनेचे लाभारती वंचितच

घरकुल योजनेतील अनियमित्येला घेऊन महिला धडकल्या नगरपालिकेत,बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव येथील शेगाव नगरपालिकेमार्फत शहरात रमाई आवास घरकुल योजनेअंतर्गत घरकुल निर्माण करण्याचे कामे सुरू आहे. मात्र यामध्ये मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना वगळून, मागून आलेल्या अर्जाला मान्यता दिल्या जात असल्याचा आरोप करीत, शेगाव शहरातील 270 घरकुल मंजूर असलेल्या महिलांनी आज शुक्रवारी, नगरपालिकेवर धडक मोर्चा काढला. अचानक काढलेल्या या मोर्चामुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते.शेगाव शहरात रमाई आवास घरकुल योजना आणि पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत कामे सुरू आहेत. यामध्ये 270 पात्र नागरिकांना घरकुल मंजूर झालेले आहेत. मात्र मंजूर असलेल्या अर्जदारांना वगळून नव्याने दाखल झालेल्या अर्जदारांना पात्र यादीमध्ये अग्रक्रम दाखवल्या जात असल्याचा आरोप घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांचा आहे, या संदर्भात मागील काही दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फेऱ्या शहरात होत असताना, आज माजी नगरसेवक नितीन शेगोकार यांच्या नेतृत्वामध्ये, इंदिरानगर, भीम नगर व शहरातील इतर भागातील नागरिकांनी विशेषत महिला वर्गांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी मुख्याधिकारी जयश्री काटकर यांना भेटून यादीमध्ये घोळ झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यानंतर मोर्चेकरांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढीत पोलीस स्टेशन आणि तहसील कार्यालयातही पोहोचून निवेदन सादर केले अचानक पणे काढण्यात आलेल्या या मोर्चा नंतर पोलीस प्रशासनासह पालिका प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली होती.स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकर

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button