महाराष्ट्रविदर्भ

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) विद्यापीठ समितीच्या वतीने विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन आंदोलन

आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ,औरंगाबाद येथे स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) विद्यापीठ समितीच्या वतीने विद्यापीठातील पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या मागण्यांना घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्य प्रशासकी इमारती समोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. SFI च्या शिष्टमंडळांने विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रमोद येवले यांना भेटून सर्व मागण्यावर सविस्तर अशी चर्चा केली.कुलगुरूंनि जवळपास सर्व मागण्यांबाबतीत सकारात्मक प्रतिसाद दिला व या मागण्या लवकरात लवकर पूर्ण केल्या जातील असे आश्वासन दिले.या मान्य केलेल्या मागण्यांवर जर लवकर काम सुरू केले नाही तर एक महिन्यानंतर परत आंदोलन करण्याचा ईशारा विद्यापीठ प्रशादनाला SFI च्या वतीने देण्यात आलायावेळी SFI चे माजी राज्यसहसचिव नितीन वाव्हळे, राज्य उपाध्यक्ष सत्यजित मस्के, जिल्हा सचिव अशोक शेरकर, जिल्हा उपाध्यक्ष मनीषा बल्लाळ, राज्य कमिटी सदस्य अनुजा सावरकर, विद्यापीठ सचिव विश्वजीत काळे,अरुण मते, राजेभाऊ डोंगरदिवे, प्रदीप चव्हाण, कृष्णा रटके, राजेश बदरगे इ विद्यार्थी कार्यकर्ते व विविध विभागातील विद्यार्थी उपस्थित होते. स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस बुलढाणा प्रतिनिधी रामा इंदोरे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button