बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

मायक्रो फायनान्स कंपन्याकडून करण्यात येणारी सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवा, वंचित बहुजन आघाडी संग्रामपूर तालुका, यांचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.!!!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस,

संग्रामपूर तालुका प्रतिनिधी,

रतन भगत.

संग्रामपूर, दि.१७/१०/२६ सविस्तर वृत्त असे की, यावर्षी महाराष्ट्रातील सरकारने नुकताच कोरडा दुष्काळ जाहीर केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थिती व ग्रामीण भागातील आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर महिलांकडे मायक्रो फायनान्स कंपन्याकडून करण्यात येणारी सक्तीची कर्ज वसुली तातडीने थांबवावी व संबंधित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलावून पीडित महिलांना ताबडतोब संरक्षण देण्यात यावे अशी मागणी संग्रामपूर तालुका वंचित बहुजन आघाडी चे तालुका अध्यक्ष किशोर भाऊ भिडे यांनी तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्याकडे केलेली आहे.
महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये पाणीटंचाई, शेतीविषयक अडचणी, रोजगाराची कमतरता, वाढती महागाई, आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील ताण यामुळे सर्वसामान्य कुटुंबांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत अनेक गरीब, शेतकरी, कष्टकरी, मजूर वर्ग, शेतमजूर, आणि ग्रामीण कामगार व अल्प उत्पन्न गटातील महिलांनी घेतलेल्या मायक्रो फायनान्स कर्जाचे हप्ते भरणे कठीण होत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत काही मायक्रो फायनान्स कंपन्यांचे कर्मचारी व वसुली प्रतिनिधी महिलांकडे वारंवार जाऊन हप्त्यांसाठी दगादा लावत असल्याच्या मानसिक दबाव आणत असल्याच्या अपमानास्पद वर्तन करीत असल्याच्या तसेच शक्तीने वसुली करण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. या तक्रारींची निष्पक्ष चौकशी व्हावी असे सुद्धा निवेदनामध्ये म्हटलेले आहे. कर्जाची परतफेड करणे ही कर्जदाराची करारानुसार असलेली जबाबदारी असली, तरी वसुलीच्या नावाखाली कोणत्याही महिलेला धमकावणे, अपमानित करणे, मानसिक त्रास देणे किंवा तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचविणे योग्य नाही. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ सदृश्य परिस्थिती आणि रोजगाराच्या अभावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या कुटुंबाशी मानवी दृष्टिकोनातून व्यवहार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी निवेदनामध्ये नमूद केले आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या मायक्रो फायनान्स कर्ज विषयक नियमात निर्देशानुसार कर्ज वसुली करणे ,धमकी देणे, अपमानास्पद भाषा वापरणे, कर्जदाराला सकाळी नऊ पूर्वी किंवा संध्याकाळी सहानंतर वारंवार फोन करणे, कर्जदाराचे नाव सार्वजनिक करणे अथवा हिंसेची धमकी देणे यासारख्या प्रकारांना कठोर वसुली पद्धती मानली जाते. कर्जदाराच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी संबंधित नियमानाधीन वित्तीय संस्थांनी यंत्रणा उपलब्ध करून देणेही अपेक्षित आहे .त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्ह्यातील मायक्रो फायनान्स कंपन्या कडून महिलांवर होत असल्याच्या सक्तीच्या व त्रासदायक कर्ज वसुलीच्या तक्रारींची ताबडतोब दाखल घ्यावी. असे सुद्धा निवेदनामध्ये नमूद केले आहे. जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व संबंधित मायक्रो फायनान्स कंपन्यांचे शाखा व्यवस्थापक कार्यालय प्रमुख, वसुली अधिकारी व वरिष्ठ प्रतिनिधी यांची तातडीने बैठक बोलवावी. या बैठकीस वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा शहर व तालुका पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याची संधी द्यावी. अशी सुद्धा या निवेदनामध्ये नमूद केले आहे. निवेदन देतेवेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दीपक भाऊ पहुरकर, यशवंत वानखडे, सचिन भाऊ शेगोकार, विक्रांत सपकाळ, अशोक भाऊ वानखडे, भाऊराव भाऊ गवांदे, निलेश भाऊ लहासे, तथागत अंभोरे, संदेश वाकोडे, राहुल भाऊ भिलंगे, अतुल भिलंगे, अक्षय ससाने, संतोष खंडेराव, अजय वानखडे ,जयेश इंगळे ,मिलिंद वानखडे ,अलकाताई भिलंगे ,उज्वला वाघ ,रूपाली तायडे, कोकिळा बोदळे, रेखा पाटोळे ,निर्मलाताई घुले, संतोषी वानखडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button