हिंगणा गावात वर्षावासानिमित्त धम्मज्ञानाचा जागर! भारतीय बौद्ध महासभेच्या पदाधिकाऱ्यांकडून ग्रंथवाचन व धम्ममार्गदर्शन…..!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद
हिंगणा:- १६ ऑक्टोबर २०२६
जळगाव जामोद तालुका भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष तथा संस्कार आयुष्यमान मधुकरजी गवई, जळगाव जामोद तालुक्याचे माजी अध्यक्ष आयुष्यमान साहेबरावजी भगत व भारतीय बौद्ध महासभेचे संघटक आयुष्यमान तानाजी गवई यांचे धम्ममार्गदर्शन संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा येथे वर्षावासानिमित्त सुरू असलेल्या ग्रंथवाचन कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, या माध्यमातून गावातील उपासक-उपासिकांना भगवान गौतम बुद्धांच्या विचारांची आणि धम्माच्या शिकवणीची सखोल माहिती मिळत आहे. या कार्यक्रमाला जळगाव जामोद तालुक्यातील भारतीय बौद्ध महासभेचे उपाध्यक्ष तथा संस्कार आयुष्यमान मधुकरजी गवई यांनी भेट देऊन स्वतः ग्रंथाचे वाचन केले. तसेच ग्रंथातील विचारांचा अर्थ उपस्थितांना सोप्या आणि समजेल अशा भाषेत समजावून सांगितला. यावेळी जळगाव जामोद तालुक्यातील माजी तालुकाध्यक्ष आयुष्यमान साहेबरावजी भगत हे देखील उपस्थित होते. आणि भारतीय बौद्ध महासभेचे संघटक आयुष्यमान तानाजी गवई हे सुद्धा उपस्थित होते. या मान्यवरांनी ग्रंथवाचनाचे महत्त्व विशद करत उपस्थितांना धम्मविचारांची माहिती दिली. ग्रंथातील शिकवण केवळ वाचण्यापुरती मर्यादित न ठेवता ती दैनंदिन जीवनात आचरणात आणणे किती महत्त्वाचे आहे, याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.
वर्षावास हा बौद्ध परंपरेतील एक महत्त्वपूर्ण कालखंड मानला जातो. या काळात धम्माचे अध्ययन, ग्रंथवाचन, चिंतन आणि सदाचाराच्या मार्गावर चालण्याला विशेष महत्त्व आहे. ग्रंथवाचनाच्या माध्यमातून भगवान गौतम बुद्धांचे विचार, त्यांची शिकवण आणि मानवतावादी दृष्टिकोन समजून घेण्याची संधी. उपासक-उपासिकांना मिळत आहे.
हिंगणा येथे सुरू असलेल्या या उपक्रमामुळे गावातील नागरिकांमध्ये धम्मविषयक ज्ञानाची आवड निर्माण होत असून, ग्रंथाचे महत्त्व समजून घेण्यास मदत होत आहे. या कार्यक्रमात गावातील सर्व उपासक-उपासिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांना ग्रंथातील विचार अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आले.
धम्माचे ज्ञान, ग्रंथांचे वाचन आणि विचारांचे आचरण या माध्यमातून समाजात प्रबोधन घडवून आणण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. हिंगणा गावात सुरू असलेला हा वर्षावासानिमित्त ग्रंथवाचनाचा उपक्रम बौद्ध धम्माचा अभ्यास आणि विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे.



