बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

दुष्काळग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी; वंचित बहुजन आघाडीचे जळगाव जामोद तहसीलदारांना निवेदन….!

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी:- मुकिंदा गव्हांदे जळगाव जामोद

जळगाव जामोद:- १६ ऑक्टोबर २०२६
दिनांक १५ ऑक्टोंबर २०२६ रोजी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जळगांव जामोद चे माननीय तहसीलदार साहेब यांना निवेदन देण्यात आले नमूद केले आहे हा शासनाने दुष्काळग्रस्त जाहीर केलेला आहे आणि राज्याचे महसूल मंत्री यांनी दुष्काळग्रस्त तालुक्यातील सर्व बँक कर्जदार तसेच प्रायव्हेट संस्था मायक्रो फायनान्स यांनी कर्जदारांना तगादा लावु नये किंवा जबरदस्ती करू नये असे जाहीर केल्यानंतरही जळगांव जामोद तालुक्यातील मायक्रो फायनान्स वाले तसेच शहरातील खातेदारांना पैसे वसूल करण्यासाठी तर काही ठिकाणी कर्जदारांना धमकावण्याचा प्रयत्न होत आहे त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ करण्यात आले असतांना काही शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये परिक्षा शुल्क, शैक्षणिक फि वसुली करण्यात येत आहे अशा आशयाचे निवेदन देण्यात आले यावर माननिय तहसीलदार साहेब पवन पाटील यांनी निवेदनाची दखल घेत तात्काळ संबंधित मायक्रो फायनान्स सरकारी बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांचे तात्काळ बैठक बोलावून त्यांना मागण्या संदर्भात सूचना देऊन वसुली बंद करण्यात येईल आणि माननीय शिक्षणाधिकारी यांना फोन करून संबंधित शाळा, महाविद्यालय यांना लगेच पत्र काढण्याची सुचना दिली यावेळी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी यांनी सर्व बँक कर्जदार, मायक्रो फायनान्स,ग्रामिण कुटा, स्वतंत्र फायनान्स,बंधन बँक,स्पंदन,व इतरहि महिला बचत गट फायनान्सचे कर्मचारी जर जबरदस्तीने हप्ता वसुली करत असतील किंवा कर्जदारांना धमकावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना वंचित स्टाइलने समज देण्यात येईल आणि असा प्रकार जर कोणत्याही गावखेड्यात होत असेल तर त्या कर्जदार खातेदार यांनी वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे निवेदन देतेवेळी तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, सुनिल बोदडे,श्रिराम भिडे विजयकुमार तायडे,मंगल डोंगरदिवे,रविभाऊ जाधव, अताउल्ला खान, राहुल वानखडे, जगदिश हातेकर,सुनिता हेलोडे,सोनम वानखडे, उपसभापती प्रशांत अवसरमोल,आनंद गवई, भास्कर भगत, लोकपाल भगत, नामदेव भगत, सुनिल इंगळे, रोशन तायडे, गुलाबराव आठवले, सुरेश सिरसाट, महादेव बोदडे,यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button