बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सिद्धपीठ काळेगावः कानिफनाथ मंदिरात घुमतोय नवरात्राचा गजर

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी :गजानन तांगडे, खामगांव

खामगाव तालुक्यातील काळेगाव श्री. कानिफनाथ संस्थान तर्फे गेल्या ५ दशकाप-ासून नवरात्रोत्सव काळात कळण्याची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा प्रसाद रूपाने वितरणाचा उपक्रम राबवण्यात येत आहे. असा उपक्रम राबवणारे श्री कानिफनाथ हे विदर्भातील एकमेव संस्थान आहे. काळेगाव येथील कानिफनाथ मंदिर हे पुरातनकालीन व जागृत मंदिर आहे. गावानजीकच्या उंच टेकडीवर (गडावर) हे मंदिर आहे. नवसिद्ध पीठापैकी काळेगाव येथील हे मंदिर आठवे सिद्ध पीठ असल्याचे बोलले जाते. कानिफनाथ महाराज हे हयात असताना डोंगरा डोंगराने येऊन काळेगाव पासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या टेकडी वर वास्तव्य करत होते. ते वास्तव्यात असताना काळेगाव येथील काही लोक त्यांना भोजन द्यायचे त्यामध्ये कळण्याची भाकरी व हिरव्या मिरच्या पासून तयार केलेला ठेचा असायचा असे या गावांतील जुने लोक सांगतात. कानिफनाथ मंदिर हे कोणी उभारले, मूर्ती कोणी स्थापित केली याची कानिफनाथ महाराजांची मूर्ती. माहिती असणारे वयोवृद्ध आज या गावात हयात नाही. हे मंदिर पुरातन काळातील व जागृत मंदिर असल्याची आख्यायिका आहे. जुन्या काळात चुना व दगडाच्या साह्याने बांधलेले छोटेसे मंदिर होते. त्यामध्ये कानिफनाथ महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली होती. या मंदिरात
भाकरी-ठेच्या’ची परंपरा कायम; महिला बनवतात भाकरी तर पुरुष तयार करतात ठेचा
दर्शनासाठी काळेगाव व इतर
गावातील ग्रामस्थ यायचे. या मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. विदर्भातील कानाकोपऱ्यातून लोक याठिकाणी दर्शनासाठी येत असतात. लोकवर्गणीतून जीर्णोद्धार पर्यटनाचा कवर्गाचा दर्जा प्राप्त उंच टेकडीवर, गडावर ज्या जागी पुरातन मंदिर होते. त्या जागी आता मंदिराचा वेगवेगळ्या गावातील ग्रामस्थांतर्फे वितरण यंदा काळेगाव, ढोरपगाव, भालेगाव व नांद्री येथील ग्रामस्थांच्या वतीने वेगवेगळ्या तारखांना कळण्याची भाकरी व हिरव्या मिरचीचा ठेचा असलेल्या प्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. विशेष उल्लेखनीय म्हणजे ज्या गावाच्या ग्रामस्थांतर्फे प्रसादाचे वितरण करण्यात येते त्या गावच्या महिला या गडावर येऊन भाकरी तयार करतात तर पुरुष ठेचा तयार करतात. जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी आज भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहेत. मंदिर संगमरवरी दगडा पासून तयार करण्यात आले आहे. या मंदिरात तीन फुटाची कानिफनाथ महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. आज या संस्थानाला क वर्गाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या ठिकाणी खासदार प्रतापराव जाधव यांच्या निधीतून सभागृह उभारण्यात आले आहे. सरकारकडून तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी मिळणाऱ्या निधीतून या ठिकाणी मंदिराच्या विश्वस्त मंडळातर्फे भाविकांसाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मंदिराचे विश्वस्त मंडळ कानिफनाथ संस्थानच्या अध्यक्षपदाची धुरा ज्ञानदेव रामकृष्ण गायगोळ हे सांभाळत आहेत. तर विश्वस्त मंडळामध्ये सुनील जोहरी, रामेश्वर राहाणे, दिलीप चव्हाण, मनोहर गिरे, मधुकर बोचरे, सुभाष अंबलकार, संजय दिवनाले, वासुदेव मालठाणे, राजेंद्र बोचरे, सोपान राहाणे, जगन्नाथ बोचरे, नीलेश इंगळे, समाधान मांगटे, अनंता बोचरे, वसंत मोळे, जगन्नाथ जोहरी, विलास इंगळे, गणेश इंगळे यांचा समावेश आहे. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी व प्रसाद वितरणासाठी काळे -गाव येथील ग्रामस्थांचे योगदान लाभते. मंदिराला यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. उंच टेकडीवर, गडावर ज्या जागी पुरातन मंदिर होते. त्या जागी आता मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्या ठिकाणी आज भव्य असे मंदिर उभारण्यात आले आहेत. मंदिर संगमरवरी दगडापासून तयार करण्यात आले आहे. या मंदिरात तीन फुटांची कानिफनाथ महाराजांची मूर्ती स्थापित करण्यात आली आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button