जळगावा जिल्हाबुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

सुर्योदय अकॅडमी येथे डेमो पोलीस भरती उत्साहात संपन्नसुर्योदय अकॅडमी देऊळगाव राजा येथे डेमो पोलीस भरती उत्साहात संपन्न

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

प्रतिनिधी – शंकर शिवरकर

देऊळगाव राजा : दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सुर्योदय अकॅडमी देऊळगाव राजा शाखा 2 यांच्या वतीने विद्यार्थ्यांना पोलीस भरती प्रक्रियेचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी आयोजित करण्यात आलेली डेमो (सराव) पोलीस भरती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.
या सराव भरतीमध्ये सकाळी ६.०० ते ९.३० वाजेपर्यंत मैदानी चाचणी घेण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांची लेखी परीक्षा घेण्यात आली. मैदानी चाचणीपासून लेखी परीक्षेपर्यंतची संपूर्ण प्रक्रिया एकाच दिवशी पूर्ण करण्यात आली. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष पोलीस भरती प्रक्रियेचा अनुभव घेण्याची आणि आपली तयारी तपासण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमाला संदीप विघ्ने, धीरज सवडे, बाबासाहेब जाधव व दिगंबर कपाटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुर्योदय अकॅडमीचे संचालक श्री. प्रल्हाद देशमुख होते.

विशेष म्हणजे बुलढाणा LCBचे श्री. दिगंबर कपाटे यांनी सुर्योदय अकॅडमीच्या ग्राउंडची पाहणी करून ग्राउंडच्या नियोजनाचे व व्यवस्थेचे विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी आवश्यक असलेल्या मैदानी सरावासाठी ग्राउंडची व्यवस्था चांगली असल्याचे त्यांनी नमूद केले.
या डेमो भरतीमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रत्यक्ष भरती प्रक्रियेप्रमाणे मैदानी चाचणी व त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मक वातावरण निर्माण झाले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या तयारीतील बलस्थान व कमतरता ओळखण्यास मदत झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्री. बोडखे, श्री. बळीराम खडूळ, श्री भागवत तांबेकर श्री. समाधान सानप व श्री. अक्षय मेहत्रे तसेच शाखा 2 चे सर्व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.
विद्यार्थ्यांना पोलीस भरतीसाठी अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने सुर्योदय अकॅडमीच्या वतीने अशा प्रकारचे सराव उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे संचालक श्री. प्रल्हाद देशमुख यांनी सांगितले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button